पोलिसांनी मध्यरात्री नाइटीमध्ये केली अटक, मोहम्मद शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप

पोलिसांनी मध्यरात्री नाइटीमध्ये केली अटक, मोहम्मद शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप

क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने पोलिसांनी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.

  • Share this:

लखनऊ, 02 मे : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीला शांततेच्या काऱणास्तव पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता तीने आरोप केला आहे की, पोलिसांनी माझ्याशी गैरवर्तन केलं तसेच विनाकारण मला ताब्यात घेतलं. याप्रकरणी शमीची पत्नी हसीन जहाँने अतिरिक्त पोलिस महासंचालक अविनाश चंद्र यांच्याकडे तक्रार केली आहे.

हसीन जहाँने म्हटलं आहे की, पोलिसांनी रात्री 12 वाजता तिला खोलीतून बाहेर ओढून काढलं. त्यावेळी अंगावर असलेल्या कपडे बदलण्यासही वेळ न देता तिला पोलीसांनी ताब्यात घेतलं. या तक्रारीनंतर अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हसीन जहाँने बुधवारी अतिरिक्त पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यावेळी तिने पोलिसांविरोधात तक्रार दिली. तक्रारीत हसीन जहाँने म्हटलं आहे की, 28 एप्रिलला संध्याकाळी मी मुलगी आयेशासोबत पतीच्या घरी पोहोचले. त्यावेळी सासरच्या मंडळींनी शमीला फोन केला. त्यानंतर तासभराने पोलिस आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलीसोबत माझ्या खोलीत गेले. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास दरवाजा उघडला. तेव्हा पोलिसांनी थेट हात पकडून बाहेर ओढलं. यावेळी मोबाईल काढून घेतला. मी ज्या अवस्थेत होते तशीच पोलीस ठाण्यात घेऊन गेले असा आरोप तीने पोलिसांवर केला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथं जबरदस्तीनं एका कागदावर अंगठा घेण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी शिव्याही दिल्याचा आरोप हसीन जहाँनं केला आहे. एक दिवसानंतर हसीन जहाँला शांततेचा भंग केल्या प्रकरणी दंड करण्यात आला. त्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्य़ात आली. पतीच्या दबावाखाली पोलिसांनी तिच्याशी जबरदस्ती केली असा आरोपही हसीन जहाँने केला आहे.

SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट

First published: May 2, 2019, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading