Home /News /sport /

'विराट-रोहितकडून शिका', पाकिस्तानी क्रिकेटपटूचा देशातल्या युवा खेळाडूंना सल्ला

'विराट-रोहितकडून शिका', पाकिस्तानी क्रिकेटपटूचा देशातल्या युवा खेळाडूंना सल्ला

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची नेहमीच तुलना केली जाते, त्यातच आता पाकिस्तानचा माजी दिग्गज बॅट्समन मोहम्मद युसूफने (Mohammad Yusuf) मोठं वक्तव्य केलं आहे.

    मुंबई, 22 मे : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची नेहमीच तुलना केली जाते, त्यातच आता पाकिस्तानचा माजी दिग्गज बॅट्समन मोहम्मद युसूफने (Mohammad Yusuf) मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. पाकिस्तानचा माजी विकेट कीपर मोईन खानचा (Moeen Khan) मुलगा आजम खान (Azam Khan) याने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही, पण त्याची गणना पाकिस्तानमधल्या प्रतिभावान खेळाडूंमध्ये होत आहे. आजम खानला चांगला बॅट्समन व्हायचं असेल आणि मोठा प्रवास करायचा असेल, तर त्याने रोहित आणि विराटकडे बघावं, असं मोहम्मद युसूफ म्हणाला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून (Quetta Gladiators) खेळणारा आजम खान त्याच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आला होता. यानंतर त्याने वजन कमी करून उत्कृष्ट कामगिरी केली. टी-20 क्रिकेटमध्ये आजमने 36 सामन्यांमध्ये 157.41 च्या स्ट्राईक रेटने 743 रन केले. त्याने 45 सिक्स मारले आणि 4 अर्धशतकंही केली. आजमने मागच्यावर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहम्मद युसूफ म्हणाला, 'आजम युवा खेळाडू आहे आणि त्याने प्रथम श्रेणीमध्ये फक्त एकच मोसम खेळला आहे. तो उत्साही आणि भावनात्मक खेळाडू आहे, तसंच त्याला सिक्स मारायला आवडतं. तो अद्भूत कव्हर ड्राईव्ह मारतो आणि मोठे सिक्सही फटकावतो, पण जेव्हा गरज असेल तेव्हाच सिक्स मारले पाहिजेत. त्याने विराट कोहली, बाबर आजम, रोहित शर्मा आणि केन विलियमसन यांच्यासारख्या बड्या खेळाडूंकडे बघितलं पाहिजे.' काहीच दिवसांपूर्वी युसूफने विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. विराटचा फिटनेस आणि त्याची ट्रेनिंग हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे, असं युसूफ म्हणाला होता. 'विराटच्या नावावर वनडे आणि टेस्टमध्ये 70 शतकं आहेत. तो वनडेमध्ये 12 हजार आणि टेस्टमध्ये 10 हजार रनच्या जवळ आहे. टी-20मध्येही त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. सध्याच्या जमान्यातला तो सर्वोत्तम बॅट्समन आहे. मागच्या जमान्यातल्या क्रिकेटपटूंसोबत तुलना करणं चुकीचं आहे, हे मी आधीही म्हणालो होतो. विराटची कामगिरी अविश्वसनीय आहे,' अशी प्रतिक्रिया मोहम्मद युसूफने दिली. युसूफने पाकिस्तानसाठी 288 वनडेमध्ये 9,720 रन आणि 90 टेस्टमध्ये 7,530 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Pakistan, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या