शमीच्या पत्नीनं सांगितलं, मी शेवटच्या श्वासापर्यंत घटस्फोट देणार नाही

शमीच्या पत्नीनं सांगितलं, मी शेवटच्या श्वासापर्यंत घटस्फोट देणार नाही

शमीच्या पत्नीनं एक नवं वक्तव्य केलं आहे. 'मोहम्मद शमी हा एक फ्लर्टी माणूस आहे.' असा थेट आरोप तिने केला आहे.

  • Share this:

08 मार्च : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप हसीन जहांने केला आहे. याच दरम्यान, शमीच्या पत्नीनं एक नवं वक्तव्य केलं आहे. 'मोहम्मद शमी हा एक फ्लर्टी माणूस आहे.' असा थेट आरोप तिने केला आहे.

याबाबत बोलताना हसीन जहां म्हणाली की, 'मी शेवटच्या श्वासापर्यंत मोहम्मद शमीला घटस्फोट देणार नाही. शमीवर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावेही माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी त्याला लवकरच कोर्टात खेचेन.' या सर्व प्रकारादरम्यान शमीला बीसीसीआयनेही मोठा धक्का दिला आहे. बीसीसीआयने कालच कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीला वगळलं आहे. शमीला नेमकं का वगळलं याचं कारण स्पष्ट नसलं तरी एकूणच त्याला याच प्रकाराचा फटका बसल्याची चर्चा आहे.

हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र 'एबीपी आनंदो'च्या पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीन जहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलंच असल्याचं त्यांनी सांगितलं. 27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे.

First published: March 8, 2018, 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading