क्रिकेटर मोहम्मद शमीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

क्रिकेटर मोहम्मद शमीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केलीय. यात शमीची आई, बहीण, भाऊ आणि वहिनी सगळ्यांची नावं आहेत.

  • Share this:

09 मार्च : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पत्नी हसीन जहानच्या तक्रारीनंतर शमीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेत. हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाशिवाय मोहम्मद शमीविरोधात इतर अजामीनपात्र गुन्हेही दाखल करण्यात आलेत. पत्नीनं काल रात्री मोहम्मद शमीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मोहम्मद शमीचे इतर स्त्रियांशी अैनितिक संबंध असल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केलाय.

भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केलीय. यात शमीची आई, बहीण, भाऊ आणि वहिनी सगळ्यांची नावं आहेत. शमीवर खुनाचा प्रयत्न आणि शमीच्या भावावर बलात्काराचा खटला दाखल केलाय. शमीच्या पत्नीनं सांगितलं की तिला शमीच्या भावासोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं गेलं.

शमीच्या पत्नीनं जेव्हा फेसबुकवर शमीच्या विरोधात पोस्ट लिहिली, तेव्हा शमीनं त्यावर असं लिहिलं की त्यांच्या कुटुंबाला कुणी तरी तोडायला पाहतं.

न्यूज18 हिंदीशी बोलताना शमीची पत्नी हसीन जहाँनं सांगितलं, शमीचे इतर स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्यामुळेच त्यानं तिला मारण्याची धमकी दिली.

हसीन जहां म्हणाली, 'मला शमीचं कुटुंब विष देऊन मारायचा प्रयत्न करत होतं. मला जेवणात काही खाऊ घालायचे. मग मी दोन-तीन दिवस बेडमधून उठू शकत नव्हती.'

हसीनच्या म्हणण्याप्रमाणे शमी लग्नानंतर बदलला. तो आपल्या बायकोला मीडियापासून लपवून ठेवायचा.

First published: March 9, 2018, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading