'शमी कॅरेक्टरलेस', पत्नी हसीन जहाँचे BCCI वरसुद्धा गंभीर आरोप

'शमी कॅरेक्टरलेस', पत्नी हसीन जहाँचे BCCI वरसुद्धा गंभीर आरोप

हसीन जहाँने पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा करताना शमीसह BCCI वरही गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

कोलकाता, 03 सप्टेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरुद्ध पश्चिम बंगालमधील न्यायालयानं अटक वॉरंट काढलं आहे. 15 दिवसांत शमीला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पत्नी हसीन जहाँनं मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. शमी विंडीज दौऱ्यावरून परत येताच आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयने हे प्रकरण आणि कागदपत्रे पाहून शमीबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे.

शमीच्य़ा पत्नीने फेसबुकवर काही स्क्रिनशॉट शेअर केले होते. यामध्ये तिनं शमीवर अनेक आरोप केले आहेत. ती म्हणते की, शमीनं जे केलं त्याचं मला खूप वाईट वाटतं. मला माझा खर्च मिळायला हवा. ममता बॅनर्जी यांचे आभार मानले असून जीवाला धोका असल्याचंही हसीन जहाँनं म्हटलं आहे.

हसीन जहाँनं माध्यमांशी बोलताना म्हटलं की, मी गरीब घरातील असून संसार मोडला याचं दु:ख आहे. माझी मुलगी आहे. त्याला तुरुंगात पाहण्याची इच्छा नाही. तो सुधारणार असेल तर त्याला माफ करण्यासाठी तयार आहे असंही शमीच्या पत्नीनं म्हटंल आहे.

माझं करिअर सोडून त्याच्यासोबत राहिले. तो खेळताना त्याच्यासाठी नमाज अदा करत होते. पण तो खूपच वाईट आहे. लहान घरातून मोठा झाला पण तरीही माणूस म्हणून लहानच राहिला असल्याचा आरोप हसीन जहाँनं केला आहे.

हसीन जहाँनं दावा केला आहे की, शमीनं टिकटॉकवर अकाउंट तयार केलं आहे. चरित्रहिन असलेला शमी तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींना फॉलो करत आहे. तसेच बीसीसीआयशी वाद नाही मात्र आपल्या अंगावर घाण उडू नये म्हणून ते सावध भूमिका घेत आहेत असंही तिने म्हटलं आहे.

पोलिसांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप हसीन जहाँनं दिला आहे. शमीकडून थेट कधी धमकी मिळाली नाही मात्र त्याला ओळखणाऱ्यांनी पैसे देणार नाही, तुला रस्त्यावर आणेन असं धमकावल्याचं हसीन जहाँ म्हणाली.

मोहम्मद शमीकडून आतापर्यंत उघडपणे यावर कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. विंडीज दौऱ्यावर त्यानं कसोटी मालिकेत 9 विकेट घेतल्या आहेत. आता विंडीज दौऱ्यावरून परतल्यानंतर तो पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे.

शमीमुळे बदललं बुमराहचं आयुष्य, धोनीनं केली होती मोठी भविष्यवाणी!

दरम्यान या प्रकरणात आता बीसीसीआयनं मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआयनं म्हटलं की, शमीवर केलेल्या आरोपांचे आरोपपत्र पाहिल्याशिवाय त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळ शमीला काहिसा दिलासा मिळाला आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, “या प्रकरणात त्वरित कारवाई करणे योग्य होणार नाही. सध्या शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघासोबत खेळत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल”, असे सांगितले.

शमी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार? पत्नी म्हणते, आरोप सिद्ध झाले

2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचाही आरोप केला होता. हसीन जहाँने शमीचे फेसुबक आणि व्हॉट्स अॅप चॅटही प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत असाही आरोप हसीनने केला होता. हसीन जहाँने फक्त शमीविरोधातच नाही तर त्याच्या कुटुंबीयांविरोधातही तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचार करण्यात आला असा आरोप तिने केला होता. हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली. आता या सगळ्या प्रकरणांपैकी हुंडा मागणे आणि लैंगिक छळ करणे या दोन प्रकरणात मोहम्मद शमीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही बाब निश्चितच शमीच्या अडचणी वाढवणारी ठरली आहे.

मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटवर BCCIने दिली प्रतिक्रिया म्हणाले...

विकेट मिळाल्यावर भडकले बुमराह आणि कोहली, प्रेक्षकांना दिला इशारा!

घोडागाडी शर्यतीत अपघात, ट्र्रॅक सोडून लोकांमध्ये घुसली घोडे; थरारक VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 3, 2019, 1:58 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading