Home /News /sport /

मुलगी सरस्वती पूजन करत असलेला फोटो पोस्ट केल्यानं शमी ट्रोल

मुलगी सरस्वती पूजन करत असलेला फोटो पोस्ट केल्यानं शमी ट्रोल

भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी नेहमीच त्याच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. दोनच दिवसांपूर्वी त्याने भावाला मुलगी झाल्याची बातमी सांगितली होती.

  मुंबई, 04 फेब्रुवारी : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घरी नन्ही परी आल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्याआधी शमीने त्याच्या मुलीचाही एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमुळे काहींनी त्याच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. शमीने मुलगी सरस्वती पूजन करत असलेला फोटो शेअर केला. यामध्ये शमीची मुलगी साडी नेसली आहे. यामुळे मुस्लिम समुदायातील काहींनी त्याच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र चाहत्यांनी शमी खरा भारतीय असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं.
  इन्स्टाग्रामवर शमीने मुलगी आयराचा फोटो शेअर करताना म्हटलं की, खुप  सुंदर दिसते... तुला खुप आशिर्वाद... लवकरच भेटू. शमीच्या मुलीने पिवळ्या आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. यात तिच्या मागच्या बाजूला सरस्वती पूजन केल्याचं दिसत आहे. दरम्यान, शमीच्या य़ा पोस्टवर काहींनी तू मुसलमान आहेस तुला हे शोभत नाही असं म्हटलं आहे. तसंच असं करू नकोस असा सल्लाही दिला आहे.
  शमीने न्यूझीलंडडविरुद्धची टी20 मालिका संपताच एक पोस्ट केली होती. त्याच्या घरी नन्ही परी आल्याचं सोशल मीडियावर म्हटलं होतं. शमीच्या लहान भावा मुलगी झाल्याची बातमी त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून सांगितल होती. सेमीफायनलमध्ये यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या