मुलीच्या वाढदिवशी भावुक झाला शमी, ट्विटरवरून व्यक्त केले दु:ख

मुलीच्या वाढदिवशी भावुक झाला शमी, ट्विटरवरून व्यक्त केले दु:ख

पत्नी हसीन जहांसोबत सुरु असलेल्या वादामुळं शमी आपल्या परिवारापासून दूर आहे. त्यामुळं मुलीला तो भेटू शकलेला नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये हॅट्रिक घेत भारताला सेमीफायनलपर्यंत पोहचवणारा भारतीय जलद गोलंदाज मोहम्मद शमीचे सगळीकडे कौतुक होत आहे. दरम्यान काहीकाळापासून शमीच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणी आल्या होत्या. मात्र, या सगळ्या अडचणींवर मात करत शमीनं वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली. आपली पत्नी हसीन जहांसोबत सुरु असलेल्या वादामुळं शमी आपल्या परिवारापासून दूर आहे. आपल्या मुलीलाही शमी कित्येक दिवसांपासून भेटू शकला नाही आहे. दरम्यान ट्वीटवर शमीनं आपल्या मुलीपासून दूर असल्याचे दु:ख व्यक्त करत भावूक ट्वीट केले.

वर्ल्ड कपमध्ये शमी भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये होता. दरम्यान सेमीफायनलमध्येच भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. मात्र भारतीय संघ इंग्ंलडमध्ये असल्यामुळं शमीला आपल्या मुलीच्या वाढदिवशी हजर राहता आले नाही. त्यामुळं शमीनं ट्वीटरवरून आपल्या मुलीला शुभेच्छा दिल्या. शमीनं, "मला तुझी खूप आठवण येत आहे. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. काळजी करू नको, मी तुला भेटायला लवकरच येणार आहे", असे ट्वीट केले.

दरम्यान, काही दिवसांपासून शमी आणि त्यांची पत्नी यांची कोर्टात केस सुरु आहे. शमीच्या पत्नीनं शमी आणि त्याच्या घरच्यांवर मारहाणीचे आरोप केले होते. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात शमीची वर्ल्ड कपसाठी निवड झाली. पहिल्या काही सामन्यात शमीला संघात जागा देण्यात आली नव्हती, मात्र भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यानंतर शमीला संघात घेण्यात आले. शमीनं वर्ल्ड कपमध्ये केवळ चार सामने खेळले. यात त्यानं अफगाणिस्तान विरोधात घेतलेल्या हॅट्रीकसह 14 विकेट घेतल्या.

VIDEO: सत्ता असूनही सेनेचा मोर्चा; विरोधकांचा हल्लाबोल, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: July 17, 2019, 4:09 PM IST

ताज्या बातम्या