Home /News /sport /

IPL मध्ये दिसलं टीम इंडियाचं बॉन्डिंग, विराटला मिळाली गुजरातच्या खेळाडूची साथ, VIDEO

IPL मध्ये दिसलं टीम इंडियाचं बॉन्डिंग, विराटला मिळाली गुजरातच्या खेळाडूची साथ, VIDEO

Virat Kohli

Virat Kohli

9 सामन्यानंतर विराटलाला अर्धशतक ठोकण्यात यश आले. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हंगामातील आपले पहिलेवहिले अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या अर्धशतकी खेळीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा स्टँड्समध्ये जल्लोष साजरा करताना दिसली. तसेच विरोधी संघाचा खेळाडू मोहम्मद शमी (mohammed shami) यानेही विराटला शुभेच्छा दिल्या.

पुढे वाचा ...
  मुंबई, 1 मे: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये धावा करण्यासाठी झगडताना दिसत होता. दरम्यान, 9 सामन्यानंतर विराटलाला अर्धशतक ठोकण्यात यश आले. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हंगामातील आपले पहिलेवहिले अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या अर्धशतकी खेळीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा स्टँड्समध्ये जल्लोष साजरा करताना दिसली. तसेच विरोधी संघाचा खेळाडू मोहम्मद शमी (mohammed shami) यानेही विराटला शुभेच्छा दिल्या. या सामन्यात बेंगलोरचा (RCB vs GT) संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी आले होते. परंतु फाफ खातेही न खोलता पव्हेलियनला परतला. डावातील दुसऱ्या षटकात प्रदीप सांगवानने त्याला यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर विराटने रजत पाटीदारला साथीला घेत संघाचा डाव पुढे नेला. IPL 2022 : अश्निनच्या बायकोनं जिंकलं मन, रडणाऱ्या रितिकाला दिली 'जादूची झप्पी' VIDEO
  फटके मारत विराटने ४५ चेंडूत आपले अर्धशतक (Virat Kohli Half Century) पूर्ण केले. डावातील 13 व्या षटकात एक धाव घेत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, मागच्या १४ आयपीएल सामन्यात विराटचे हे पहिले अर्धशतक आहे. हे षटक गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच (Mohammad Shami) टाकत होता. विराटने त्याच्या षटकात अर्धशतक केल्यानंतर शमीने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शुभेच्छा (Mohammad Shami Congratulated Virat Kohli) दिल्या. सध्या सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. आयपीएल 2022 मध्ये आज शनिवारी गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. विजयासाठी आरसीबीने दिलेले 171 धावांचे लक्ष्य गुजरातने अखेरच्या षटकात पार केले. या विजयासह गुजरातचे गुणतक्त्यात 16 गुण झाले असून त्याचे प्लेऑफमधील स्थान देखील निश्चित झाले आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Gujarat Titans, Ipl 2022, RCB, Virat kohli

  पुढील बातम्या