पाकिस्तानच्या अलिश्बानेच केला शमीबरोबरच्या संबंधांचा खुलासा

पाकिस्तानच्या अलिश्बानेच  केला शमीबरोबरच्या संबंधांचा खुलासा

शमीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकारामुळे शमीचे वैवाहिक जीवन धोक्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शमीचे काही तरुणींसोबतचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत

  • Share this:

19 मार्च :  गेले काही दिवस बायकोने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या शमीवर आता नवीन आरोप होत आहेत.   पाकिस्तानच्या अलिश्बाकडून शमी पैसे घेत असून देशाची फसवणूक करत आहे, असे आरोपही हसीनने केले होते. पण आता अलिश्बानेच आपले शामीबरोबर कसे संबंध आहेत, हे  जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

शमीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकारामुळे शमीचे वैवाहिक जीवन धोक्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शमीचे काही तरुणींसोबतचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शमीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील प्रेयसीकडून शामी पैसे घेतो आणि देशाला धोका देत आहे, असेही हसीनने सांगितले होते.

आपल्या शामीबरोबरच्या संबंधांबद्दल अलिश्बा म्हणाली की, " मी शमीची चाहती आहे. इंस्टाग्रॅमवर मी त्याला फॉलोदेखील करते. मी शमीला दुबईमध्ये भेटली होती. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याला एक चाहती म्हणूनच भेटली होती. मला शमीला भेटण्याची इच्छा होती. पण आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये भेटलो नाही, तर शमीच्या बहिणीच्या घरीच भेटलो होतो. त्यामुळे शमीवर जे आरोप केले जात आहेत, बिनबुडाचे आहेत."

अलिश्बा पुढे म्हणाली की, " इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक सुरु असताना शमीवर काही टीका होत होती. त्यावेळी मी शमीला काही प्रश्न विचारले होते. शमीने काही काळानंतर त्या प्रश्नांवर उत्तरे दिली होती. त्यानंतर आमचा संवाद सुरु झाला. "

First published: March 19, 2018, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading