दुबई, 26 ऑक्टोबर : टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानकडून पहिल्यांदाच पराभव स्विकारावा लागल्यानंतर टीम इंडियाचा गोलंदाच मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. अशातच, मोहम्मद शमीसाठी(mohammed shami) आता पाकिस्तानचा बॅट्समन मोहम्मद रिझवान धावला (Mohammad Rizwan ) आहे. त्याने ट्विट करत ट्रोलर्सना सुंदर मेसेज दिला आहे. यातून रिझवानची खिलाडूवृत्ती पाहायाला मिळाली. पण, काही युजर्सनी त्याला दानिश कनेरियाचे उदाहरण देत फटकारले आहे.
मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. तो बॉलिंगला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 17 रनची आवश्यकता होती. पाकिस्ताननं 5 बॉलमध्येच हे रन पूर्ण करत टीम इंडियाला पराभूत केलं. त्यानंतर काही फॅन्सनी शमीवर टीका करत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरील या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
दरम्यान, मोहम्मद रिझवान याने शमीला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे. एखाद्या खेळाडूला त्याच्या देशासाठी आणि त्याच्या लोकांसाठी ज्या प्रकारचे दडपण, संघर्ष आणि त्याग करावा लागतो ते अतुलनीय आहे. शमी हा एक स्टार आणि खरंच जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे.
कृपया आपल्या स्टार खेळाडूंचा आदर करा. या खेळाने लोकांना एकत्र आणले पाहिजे. त्यांना विभाजित करू नये #Shami #PAKvIND. अशा आशयाचे ट्विट करत रिझवानने सुंदर मेसेज दिला आहे.
Shami is one of us and he will remain so. The number of people who stand with him far exceed the numbers of instagram trolls. In any case, we don't need preachings of those who discriminated against Danish Kaneria for being a hindu.
— Shivansh (@shivanshfcbm) October 26, 2021
त्याच्या या मेसेजवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने, शमी आपल्यापैकी एक आहे आणि तो तसाच राहील. त्याच्यासोबत उभ्या असलेल्या लोकांची संख्या इन्स्टाग्राम ट्रोलच्या संख्येपेक्षा जास्त आहे. कोणत्याही परिस्थितीत, दानिश कनेरिया हिंदू असल्याबद्दल भेदभाव करणाऱ्यांच्या उपदेशाची आम्हाला गरज नाही. असे म्हटले आहे.
तर दुसऱ्या एकाने, काळजी करू नका आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. तो आमच्या देशाचा दानिश कनेरिया बनणार नाही. आपल्यासारख्या धर्मांध राष्ट्रात सचिनलाही बदनाम केले गेले पण त्यामुळे आपल्या संपूर्ण देशाची व्याख्या होत नाही. काळजी आणि सामर्थ्याबद्दल धन्यवाद. असे म्हटले आहे.
तसेच दुसऱ्या एका युजरने दानिश कनेरिया सोबतही असेच घडले होते. तर त्याबद्दल कधी ट्विट केले नाही. असा सवाल उपस्थित केला आहे.
रिझवानने रविवारी अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सोमवारी युझवेंद्र चहल, इरफान पठाण, सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण यांनीही ट्विट करून शमीला पाठिंबा दिला. तसेच, राजकीय नेत्यांनीही यामध्ये उडी घेत शमीला पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हा हिंदू धर्माचा असल्यामुळे पाकिस्तानच्या संघातील अनेक खेळाडू त्याच्याशी बोलणे टाळायचे अथवा भोजनाच्या वेळी त्याच्याहून दूर बसायचे असा गंभीर खुलासा काहीवर्षापूर्वी, शोएब अख्तरने केला होता.
त्यावेळी, माझ्यावर संघातील काही खेळाडूंकडून नक्कीच चर्चा रंगायची. त्याशिवाय मी हिंदू असल्यामुळे माझ्यावर ते अनेकदा विनोदही करायचे; परंतु मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. किंबहुना त्यांच्या वागणुकीला वैतागून धर्म बदलावा, असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. मी हिंदू असल्याचा जितका मला अभिमान आहे, तितकेच पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केल्याचेही मला समाधान आहे. असे मत कनेरियाने यावेळी व्यक्त केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup