IPL 2019 : युद्धात घर सोडलेला 'हा' खेळाडू गाजवतोय IPL

IPL 2019 : युद्धात घर सोडलेला 'हा' खेळाडू गाजवतोय IPL

वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या तुफान फलंदाजीनं सगळ्यांचचं मन जिंकलं. पण याव्यतिरिक्त आणखी एक असा खेळाडू होता, ज्याच्या गोलंदाजीनं बंगळुरूचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही.

  • Share this:

हैदराबाद, 1 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे ज्वर वाढत असताना, प्रत्येक सामन्यातून किमान दोन ते तीन तरी स्टार खेळाडू वर येत आहेत. त्यातच बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या तुफान फलंदाजीनं सगळ्यांचचं मन जिंकलं. पण याव्यतिरिक्त आणखी एक असा खेळाडू होता, ज्याच्या गोलंदाजीनं बंगळुरूचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी याला 2017मध्ये हैदराबादनं आपल्या संघात घेतले होते.

बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात नबीनं बंगळुरू फलंदाजांना पळता भुई थोडी केली. नबीनं आपल्या 4 ओव्हरमध्ये केवळ 11 धावा देत 4 विकेत घेतल्या. नबी हैदराबाद करिता सर्वात चांगला गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाज ठरला.

नबीनं आपल्या 4 ओव्हरमध्ये केवळ 11 धावा देत 4 विकेत घेतल्या. नबी हैदराबाद करिता सर्वात किफायतशीर गोलंदाजी ठरला आहे.

नबीनं आपल्या 4 ओव्हरमध्ये केवळ 11 धावा देत 4 विकेत घेतल्या. नबी हैदराबाद करिता सर्वात किफायतशीर गोलंदाजी ठरला आहे.

नबी मुळचा अफगाणिस्तानचा असून, त्याचा जन्मही तिथलाच आहे. दरम्यान 1979 साली युद्धामुळं नबीला आपल्या घरच्यांसह अफगाणिस्तानवरुन पाकिस्तानात यावे लागले होते. नबीनं 2013-2015 दरम्यान अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपदही भुषविले होते. त्याने आतापर्यंत 111 एकदिवसीय सामने, तर 68 टी-20 सामने खेळले आहेत. सध्या आयपीएलमध्ये मोहम्मद नबी आणि रशिद खान असे दोनचं अफगाणिस्तानचे खेळाडू आहे आणि हे दोन्ही खेळाडू हैदराबाद संघाकडून खेळतात.

rong>VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

First published: April 1, 2019, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading