Ram Mandir Bhumi Pujan: 'द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका', मोहम्मद कैफच्या त्या ट्विटनं जिंकलं लाखो चाहत्यांचं मन

Ram Mandir Bhumi Pujan: 'द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका', मोहम्मद कैफच्या त्या ट्विटनं जिंकलं लाखो चाहत्यांचं मन

Ram Mandir Bhumi Pujan: रामनगरी अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) पार पडला.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : रामनगरी अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) पार पडला. यासह गेल्या कित्येक वर्षांपासून अपूर्ण असलेले रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. या कार्यक्रमाला जेमतेम 175 संत, महंत आणि विविध धर्मांतील मोजकी मंडळी उपस्थित होती. मात्र फक्त भारत देशातून नाही तर जगभरातून सर्व रामभक्त या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाले. राममंदिराच्या भूमिपूजनानंतर सोशल मीडियावर अनेक नेते मंडळी, अभिनेते, क्रिकेटपटू यांनी आनंद व्यक्त केला. मात्र सध्या चर्चा होत आहे ती भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या ट्विटची. मोहम्मद कैफच्या या ट्विटनं सगळ्यांचं मन जिंकलं आहे.

राममंदिराच्या भूमिपूजनानंतर मोहम्मद कैफनं ट्वीट करत, “मी अलाहाबादमध्ये मोठा झालो. गंगा-जमूनेच्या संस्कृतीत रामलीला पाहणे मला कायम आवडायचे. रामलीलातून मला दया, मोठेपणा आणि अस्तित्व यांची शिकवण मिळाली. भगवान श्री राम यांनी कायम इतरांचा चांगुलपणा पाहिला. त्यामुळे प्रेम आणि ऐक्याच्या मार्गात द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका”, असे मत व्यक्त केले.

वाचा-VIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL

वाचा-अयोध्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांनाच भूमिपूजनाचं निमंत्रण, ठाकरेंना टोला

मोहम्मद कैफनं केलेल्या ट्वीटनंतर चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच, प्रेम आणि ऐक्याच्या मार्गात द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका या त्याच्या आवाहनाचेही समर्थन केले आहे.

वाचा-राम सबके है, राम सब में है! वाचा PM नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे

दरम्यान, भूमिपूजन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे मुख्य पुजारी श्री गद्दीनशीन प्रेमदास महाराज यांच्यासोबत हनुमानाचं दर्शन घेतलं तसेच, यांनी मोदींना चांदीचा 'मुकुट' परिधान केला. मोदींसह यावेळी पूजेला सरसंघचालक मोहन भागवतही बसले होते. पूजा संपन्न झाल्यानंतर मोदींनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी, “आज संपूर्ण भारत राममय आहे. सारा देश रोमांचित आहे. मन दीपमय आहे. देश भावुक झाला आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली. कोट्यवधी लोकांचा कदाचित आजच्या दिवसावर विश्वास बसणार नाही की त्यांच्या हयातीत त्यांना आजचा हा दिवस दिसला”, असे सांगितले. तसेच, हे मंदिर उभं राहिल्यानंतर अयोध्येची भव्यता वाढेल. त्याबरोबर इथली सगळी अर्थव्यवस्थाही बदलेल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Published by: Priyanka Gawde
First published: August 5, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या