मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Mohammad Kaif ने सुरु केली निवडणूकची तयारी? 'त्या' पोस्टवरुन फॅन्सनी लावला अंदाज

Mohammad Kaif ने सुरु केली निवडणूकची तयारी? 'त्या' पोस्टवरुन फॅन्सनी लावला अंदाज

Mohammad Kaif

Mohammad Kaif

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुळ गावी भेट दिले असल्याचे फोटो शेअर केले आहेत.

  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 22 डिसेंबर: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Elections 2022) जवळ आली असून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. राजकीय नेत्यांनी जनसंपर्काचा धडाका लावला आहे. अशातच, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif ) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुळ गावी भेट दिले असल्याचे फोटो शेअर केले आहेत. त्याची ही इंस्टावरची पोस्ट पााहून त्याचे चाहते आगामी निवडणुकीसंदर्भात तर्क वितर्क लावत आहेत. मोहम्मदने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत आपल्या मूळ गावी म्हणजेच प्रयागराजमध्ये असल्याची माहिती दिली. तसेच त्याने भावनिक कॅप्शनदेखील दिली आहे. मोहम्मद कैफ सध्या त्याच्या मूळ गावी प्रयागराजमध्ये आहे. याबाबत त्याने आपल्या वडिलोपार्जित घराचे आणि रस्त्यांचे फोटो आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केले आहेत. ''तेच रस्ते, तेच लोक, तेच प्रेम. कैदगंज, अलाहाबाद येथील माझ्या वडिलोपार्जित घराच्या काही आठवणी. या परिसराने मला क्रिकेट, जीवन आणि नातेसंबंधांचा अर्थ शिकवला आहे.'' असे मोहम्मदने पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्याची ही पोस्ट व्हायरल होताच. फॅन्स अनेक तर्क वितर्क लावत आहेत. 'मला वाटले तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे' अशा कमेंट्स त्याच्या या पोस्टवर येत आहेत. तर दुसरीकडे त्याने त्याने प्रयागराजला जुन्या नावाने म्हणजेच अलाहाबाद असे संबोधल्याने काही युजर्स ट्रोल करत आहेत.
यापूर्वी, म्हणजेच 2014 ला लोकसभा निवडणुकीत मोहम्मद कैफने फुलपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पंडित जवाहरलाल नेहरूही या जागेवरून अनेकदा खासदार झाले होते. राहुल गांधींनी खूप समजावून सांगितल्यानंतर कैफने या जागेवरून निवडणूक लढवण्यास होकार दिला. मात्र मोदी लाटेतच त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी राजकारणाकडेही पाठ फिरवली.
First published:

पुढील बातम्या