क्रिकेटपटूनं शेअर केला अर्धनग्न फोटो, सोशल मीडियावर झाला ट्रोल

क्रिकेटपटूनं शेअर केला अर्धनग्न फोटो, सोशल मीडियावर झाला ट्रोल

या खेळाडूच्या अर्धनग्न फोटोची तुलना विराट कोहलीशी केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : जगभरात दिवसेंदिवस क्रिकेटचे चाहते वाढत चालले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडिया. याचबरोबर क्रिकेटरही सोशल मीडियावर तत्पर झाले आहेत. मात्र, काही क्रिकेटपटूंच्या फोटोमुळं ट्रोलिंगचे प्रमाणही वाढले आहे. यातच नुकत्याच एका पाकिस्तानही खेळाडूने टाकलेल्या अर्धनग्न फोटोवर सोशल मीडियावर चाहत्यांनी ट्रोल केले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. यात पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद हफिजला वर्ल्ड कपनंतर चांगली फलंदाजी करता आलेली नाही. वर्ल्ड कपनंतर हफिजला सतत धक्के बसत आहेत. पाकिस्तानच्या या ऑलराऊंडर खेळाडूला 2019-20मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सेंट्रल कॉंट्रक्टमध्ये घेतले नाही. त्यानंतर श्रीलंकेविरोधात 10 वर्षांनी मायदेशात होत असलेल्या मालिकेतही त्याला संघात स्थान मिळाले नाही. 2009मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी रवाना होणार आहे.

पाकिस्तानचा 38 वर्षीय ऑलराऊंडल खेळाडू मोहम्मद हफिजनं आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला. यात हफिज सेंट लुसियामध्ये सुर्यास्ताचा आनंद घेत आहे. यात हफिजनं टाकलेल्या अर्धनग्न फोटोमुळं सोशल मीडियावर ट्रोल होण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा-फलंदाजाचा जीवघेणा शॉट; थोडक्यात वाचला गोलंदाज, पाहा खतरनाक VIDEO

हफिजचा हा फोटो पाहून पाकिस्तानच्या बाहेरच तु चांगला आहेस, अशा कमेंट केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी स्वत:ला विराट कोहली समजू नकोस, असे ट्वीट केले आहे. तर, एका चाहत्यानं टीम इंडियाच्या खेळाडूंची नक्कल करायची असेल तर मैदानावर कर इकडे नको, अशा शब्दात ट्रोल केले आहे.

वाचा-क्रिकेटच्या इतिहासातील फक्त दुसराच सामना, रवी शास्त्रींनी कसोटी केली टाय!

लवकरच हफिज करणार पुनरागमन

वर्ल्ड कपनंतर संघाबाहेर असलेला हफिज कधीही संघात पुनरागमन करू शकतो. नुकतेच पाकिस्ता क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक मोहम्मद हफिजनं, भविष्यात हफिजला संघात स्थान मिळेल. सध्या हफिज कॅरिबिरयन प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे. मात्र या स्पर्धेतही हफिजला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.

कॅरेबियन लीगमध्ये सहा सामन्यात केल्या 114 धावा

हफिजनं सध्या सुरू असलेल्या कॅरेबियन लीगमध्ये (Caribbean Premier League) सहा सामन्यात फक्त 114 धावा केल्या. यात 19च्या सरासरीनं धावा केल्या, यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हफिजनं 55 कसोटी सामन्यात 37.64च्या सरासरीनं 3652 धावा केल्या आहेत. तर, 55 कसोटी सामन्यात 32.90च्या सरासरीनं 6614 धावा केल्या आहेत.

वाचा-गर्लफ्रेंडसोबत SEX हा माझ्या आयुष्यातला बेस्ट गोल! फुटबॉलपटूचे धक्कादायक वक्तव्य

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...