मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शोएब अख्तरवर भडकला मोहम्मद आसिफ, 2007 च्या प्रकरणावरून पुन्हा वाद

शोएब अख्तरवर भडकला मोहम्मद आसिफ, 2007 च्या प्रकरणावरून पुन्हा वाद

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) यांच्यात 2007 साली झालेल्या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. काहीच दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) या वादावर प्रतिक्रिया दिली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 मे : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) यांच्यात 2007 साली झालेल्या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. काहीच दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) या वादावर प्रतिक्रिया दिली होती. शोएबने मोहम्मद आसिफवर ड्रेसिंग रूममध्ये बॅटने हल्ला केला होता, असं आफ्रिदी म्हणाला. यानंतर आता आसिफनेही त्याचं मौन सोडलं आहे. शोएब अख्तरने या मुद्द्यावरून बोलू नये आणि शांत राहावं, असं आसिफ म्हणाला आहे.

'शोएब अख्तरसोबत ड्रेसिंग रूममध्ये जे काही झालं त्याबाबत तो 13 वर्ष बोलला. याबाबत त्याने खूप वक्तव्यं केली. हे ऐकून आता मी थकलो आहे, त्यामुळे आता याबाबत बोलू नकोस, असं मी त्याला सांगितलं. आता हा इतिहास झाला आहे, त्यामुळे प्रत्येक मुलाखतीमध्ये हेच सांगण्यापेक्षा समंजसपणाच्या गोष्टी करं, असं मी त्याला बोललो.' मोहम्मद आसिफने पाकिस्तानी माध्यमांना मुलाखत दिली.

शोएब अख्तर कधी पाकिस्तानच्या निवड समितीचा अध्यक्ष व्हायची स्वप्न बघतो, तर कधी त्याला मुख्य प्रशिक्षक व्हायचं असतं, असा टोलाही मोहम्मद आसिफने लगावला.

एका मस्करीमध्ये आसिफने आपली साथ दिली होती, त्यामुळे शोएब अख्तर भडकला, असं आफ्रिदी म्हणाला. शोएब अख्तरने त्याच्या आत्मचरित्रात आफ्रिदीने भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

2007 साली झालेल्या या घटनेनंतर शोएब अख्तरला दक्षिण आफ्रिकेतून परत बोलावण्यात आलं. तर पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली. फायनलमध्ये पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला. या सामन्यात मोहम्मद आसिफने 3 ओव्हरमध्ये 25 रन देऊन एक विकेट घेतली होती.

First published:

Tags: Cricket, Pakistan, Shoaib akhtar