मुंबई, 23 मे : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) भारत तसंच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याविरुद्धच्या स्पर्धेवर भाष्यं केलं आहे. याचबरोबर त्याने बॉलिंग करण्यासाठी सगळ्यात कठीण बॅट्समन कोण? या प्रश्नाचं उत्तरही दिलं आहे. क्रिकवीक या युट्यूब चॅनलसोबत बोलताना आमीरने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. विराटपेक्षा रोहित शर्मासमोर बॉलिंग करणं सोपं आहे, असं मोहम्मद आमीर म्हणाला, पण बॉलिंग करण्यासाठी विराट-रोहित नाही तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सगळ्यात कठीण असल्याचं आमीरला वाटतं.
'स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) हा बॉलिंग करण्यासाठी सगळ्यात जास्त त्रासदायक आहे, कारण त्याचं बॅटिंगचं तंत्र खूप वेगळं आहे. त्याच्या बॅटिंग स्टान्समुळे बॉलिंग करायला त्रास होतो. ऑफ साईडच्या बाहेरचे बॉल तो सोडून देतो, तसंच लेग साईडलाही तो चांगला खेळतो.' अशी प्रतिक्रिया आमीरने दिली.
'कोहलीने सगळ्या फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. तणावाच्या परिस्थितीमध्ये विराटचा खेळ खुलतो, मलाही त्याला बॉलिंग करायला मजा येते. विराट आणि रोहितला बॉलिंग करायला मी घाबरत नाही, पण रोहितपेक्षा विराटला बॉलिंग करणं जास्त कठीण आहे, कारण तो तणावाचा सामना चांगल्या पद्धतीने करतो. इनिंगच्या सुरुवातीला स्विंग होणाऱ्या बॉलसमोर रोहित संघर्ष करतो,' असं आमीर म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Pakistan, Rohit sharma, Team india, Virat kohli