मुंबई, 02 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात किम्बरलीमध्ये तिसरा एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात इंग्लंडचा संघ ५९ धावांनी विजयी झाला. सामन्यात कर्णधार जोस बटलरने १२७ चेंडूत १३१ धावां केल्या. यात बटलरने ६ चौकार आणि ७ षटकार मारले.
बटलरशिवाय डेविड मलाननेसुद्धा शतक झळकावलं. त्याने सलामीला खेळताना ११४ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ११८ धावा केल्या. तर खालच्या क्रमांकावर आलेल्या मोईन अलीने अखेरच्या षटकांमध्ये वेगवान खेळी करताना २३ चेंडूत ४१ धावा केल्या.
हेही वाचा : VIDEO : जम्मू एक्सप्रेस! उमरानचा 150च्या स्पीडने चेंडू, बेल्स 30 मीटर अंतरावर उडाली
मोईन अलीने असे काही फटके मारले ज्यामुळे चाहत्यांसह दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूसुद्धा आश्चर्यचकीत झाले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शम्सीच्या गोलंदाजीवर मोईन अलीने विचित्र फटका मारण्याचा प्रयत्न केला. यात तो एका हाताने बॅट फिरवताना दिसतो.
Cricket is basically rounders right? pic.twitter.com/LA8x4MgZM7
— Melissa Story (@melissagstory) February 1, 2023
हेही वाचा : शुभमन गिलची गाडी सुसाट! शतक झळकावताच झाले अनेक विक्रम
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज शम्सीने ४४ षटक टाकलं. या षटकातील चौथ्या चेंडूवर अलीने एका हाताने मागच्या बाजूला फटका मारण्याचा प्रयत्न केला. यात मोईन अलीला यश आलं नसलं तरी त्याच्या या शॉटचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket