Maldives : मोदींची क्रिकेट डिप्लोमसी, पाकिस्तानला असाही शह!

Maldives : मोदींची क्रिकेट डिप्लोमसी, पाकिस्तानला असाही शह!

अफगाणिस्तानप्रमाणे आता मालदीवच्या क्रिकेटला बळ देण्यासाठी बीसीसीआय मदत करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जून : पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा दौऱा करण्यासाठी मालदीवची निवड केली. परराष्ट्र धोरणात शेजारी देशांसोबतचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल टाकलं आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या परदेश दौऱ्यावर मालदीवला गेले आहेत. दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी तसेच आशिया खंडातील देशांना आपल्यासोबत घेण्यासाठी मोदींनी क्रिकेट डिप्लोमसी केली आहे. भारताचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानला भारताने क्रिकेटमध्ये याआधी मदत केली आहे. त्यानंतर आता मालदीवमधील क्रिकेटसाठी भारताकड़ून मोठी मदत दिली जाणार आहे. यामुळे अर्थातच आशिया खंडात क्रिकेटमध्ये या दोन देशांना बळ मिळेल.

मोदींच्या दौऱ्यानंतर आता मालदीवच्या क्रिडा मंत्र्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे मालदीव क्रिकेटला दत्तक घ्यावं अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे बीसीसीआयने अफगाणिस्तानला दत्तक घेतलं तसंच आमच्या देशातील क्रिकेटला मोठं करण्यासाठी मदत करावी. खेळासाठी भारताकडून खूप मदत मिळाली आहे. तसेच बीसीसीआयसोबतची चर्चा यशस्वी झाली असून क्रिकेटसाठी त्यांची मदत मिळेल. भारताचा हा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्वाचा असल्याचंही त्यांनी म्हटलं.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मोदींच्या दौऱ्याआधी सांगितले होते की भारत क्रिकेटमध्ये मालदीवला मदत करू शकतो. त्यात त्यांना स्टेडियम बांधण्यासाठीच्या आर्थिक मदतीचाही समावेश असेल. भारताकडून मालदीवला दिलेल्या प्रस्तावात त्यांच्या देशातील खेळाडूंना भारतात प्रशिक्षण देण्याचाही विचार आहे. याशिवाय इतर स्टाफलाही प्रशिक्षण दिलं जाईल. आयसीसीनं मालदीवला 2019 मध्ये असोसिएट मेंबरचा दर्जा दिला आहे.

बीसीसीआयच्या एका समितीने काही दिवसांपूर्वी मालदीवचा दौरा केला होता. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मालदीव दौऱ्यावेळी देशातील क्रिकेटला प्रोत्साहन मिळावं अशी विनंती तिथल्या क्रिडा मंत्र्यांकडून करण्यात आली होती.

मालदीव आणि अफगाणिस्तानला भारताकडून क्रिकेटसाठी दिली जाणारी मदत दोन्ही देशांतील खेळाला प्रोत्साहन देणारी आहे. अफगाणिस्तानच्या संघाचे प्रायोजकत्व यंदा भारतीय कंपनी अमूलने घेतलं आहे. शिवाय अफगाणिस्तानचे खेळाडू भारतीय मैदानावर सराव करतात. आता मालदीवलासुद्धा भारताकडून मदत दिली जाणार आहे.

VIDEO : मन्नत पूर्ण, आदित्य ठाकरे पोहोचले अजमेरच्या दर्ग्यात!

First published: June 8, 2019, 7:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading