Elec-widget

पंतप्रधान मोदींनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना दिली बॅट, 'हे' आहे खास कारण!

Modi In Maldives मोदींनी भेट दिलेल्या बॅटवर इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ICC Cricket World Cup 2019 मध्ये सहभागी असलेल्या भारतीय खेळाडूंची स्वाक्षरी आहे.

  • Share this:

दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिला परदेश दौरा मालदीवचा केला. यावेळी त्यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांना बॅट भेट दिली.

सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. यात सहभागी भारतीय संघातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या बॅटवर आहे.

मालदीवमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने मदत करावी अशी विनंती तिथल्या क्रिडा मंत्र्यांनी केली होती. त्यावर बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं मालदीवच्या क्रिडामंत्र्यांनी सांगितलं.

Loading...

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मोदींच्या दौऱ्याआधी सांगितले होते की भारत क्रिकेटमध्ये मालदीवला मदत करू शकतो. त्यात त्यांना स्टेडियम बांधण्यासाठीच्या आर्थिक मदतीचाही समावेश असेल. भारताकडून मालदीवला दिलेल्या प्रस्तावात त्यांच्या देशातील खेळाडूंना भारतात प्रशिक्षण देण्याचाही विचार आहे. याशिवाय इतर स्टाफलाही प्रशिक्षण दिलं जाईल. आयसीसीनं मालदीवला 2019 मध्ये असोसिएट मेंबरचा दर्जा दिला आहे.

बीसीसीआयच्या एका समितीने काही दिवसांपूर्वी मालदीवचा दौरा केला होता. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मालदीव दौऱ्यावेळी देशातील क्रिकेटला प्रोत्साहन मिळावं अशी विनंती तिथल्या क्रिडा मंत्र्यांकडून करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...