कर्तव्य माऊलीचे! सामना सुरू असतानाच स्तनपानासाठी थांबली खेळाडू अन्...

कर्तव्य माऊलीचे! सामना सुरू असतानाच स्तनपानासाठी थांबली खेळाडू अन्...

सोशल मीडियावर सध्या या खेळाडूचा फोटो व्हायरल होत आहे. जाणून घ्या काय आहे कारण.

  • Share this:

मिझोरम, 10 डिसेंबर : जगात कोणी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल तरी ती असते आई. मुलांच्या संगोपनासाठी आई नेहमीच तत्पर असते, असाच प्रकार मिझोरम स्टेट गेम्स 2019मध्ये घडला. या सामन्यात एक महिला खेळाडू आपली कर्तव्य न विसरता आपल्या बाळासाठी तिनं सामना थांबवला.

मिझोरमध्ये झालेल्या व्हॉलीबॉल सामन्यादरम्यान कोर्टात एक वेगळाच प्रसंग घडला. या प्रसंगानं केवळ प्रेक्षकांचे नाही तर सोशल मीडियावरही चाहत्यांची मने जिंकली. मिझोरममध्ये सोमवारी एक व्हॉलीबॉल सामना खेळवला जात होता. सामन्यादरम्यान हाफटाईम हूटर खेळताच या सामन्यात सहभागी एक खेळाडू कोर्टाबाहेर पोहोचली आणि आपल्या बाळाला दूध पाजू लागली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लालवेंटुआंगीचे हे चित्र सोशल मीडियावर फेसबुक यूजर निंगलुन हंगल यांनी शेअर केले आहे. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये, 'लाईव्ह सामन्यात 7 महिन्यांच्या बाळाला दूध पाजण्यासाठी थांबवला सामना', असे लिहिले आहे. लालवेन्टलुंगीचे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युझरनी खेळाडू आणि आई होण्याची दुहेरी जबाबदारी अशी पार पाडतात, अशा शब्दात कौतुक केले आहे. त्याचवेळी, एका युझरने या फोटोचे वर्णन विलक्षण फोटो, सलाम आईला असे म्हणून वर्णन केले आहे.

वाचा-लेक जवळ येत नाही म्हणून रोहित शर्मानं लढवली शक्कल, नव्या अवतारात आला समोर

वाचा-शिखर धवन वन डे घेणार संघातून माघार? ‘या’ 4 खेळाडूंना मिळू शकते संधी

सामना थांबवून पाजलं सात महिन्याच्या बाळाला दूध

मिझोरमच्या तुईकुम प्रदेश संघातील खेळाडू लालवेन्टलुआंगी व्हॉलीबॉल सामने खेळत होती. सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येकी एका गुणासाठी बरेच संघर्ष झाले. दरम्यान, पंचांनी हाफ-टाइम हूटर दिल्यानंतर लालवेन्टलुआंगी धावत मैदानाबाहेर गेली. मैदानाबाहेर जाताच लालवेन्टलुआंगी आपल्या सात महिन्यांच्या बाळाला दूध पाजू लागली. यावेळी कोणीतरी लालवेन्टलुआंगीचा फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लालवेन्टलुंगीचे जोरदार कौतुक केले जात आहे.

वाचा-नवी मुंबई: गाडीची टेस्ट घेताना दिला एक्सलेटरवर पाय, पहिल्या मजल्यावरून उडाली कार

10 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर

इतकेच नाही तर निंगलून यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो मिझोरमच्या क्रीडामंत्र्यांपर्यंत पोहचला. त्यानंतर मिझोरमचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाव्हिया रॉयटे यांनी लालवेन्टलुंगी यांना आर्थिक मदत देण्याचे ठरविले. रॉबर्ट रोमाव्हिया रॉयटे यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर करत, “लालवेन्टलुआंगीचा उत्साह वाढविण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मिझोरम स्टेट गेम्स 2019 हे 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 05:22 PM IST

ताज्या बातम्या