Mitali Raj Retirement : धक्कादायक! मिताली राजनं निवृत्ती घेतली नाही तर तिला घ्यायला लावली

Mitali Raj Retirement : धक्कादायक! मिताली राजनं निवृत्ती घेतली नाही तर तिला घ्यायला लावली

टीम इंडियाची दिग्गज महिला खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राजनं टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 सप्टेंबर : टीम इंडियाची दिग्गज महिला खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राजनं टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र मिताली एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे. बीसीसीआयनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. मिताली यावेळी, “2006पासून टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व आपल्या हाती घेतले होते. आता मात्र टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. माझे संपूर्ण लक्ष्य 2021 मध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपकडे आहे”, असे सांगितले.

मिताली राजनं 32 टी-20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यात 2012, 2014 आणि 2016 तीन वर्ल्ड कपमध्ये कर्णधारी केली. 2006मध्ये महिला संघानं पहिला टी-20 सामना खेळला तेव्हा मिताली कर्णधार होती. मितालीनं 89 टी-20 सामने खेळले आहे. यात तिनं 2364 धावा केल्या आहेत, यात 17 अर्धशतकांचा समावेश आहे. 97 हा मितालीचा टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्ताम खेळी ठरली आहे.

महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर अशा नावानं ओळखल्या जाणाऱ्या मितालीनं 9 मार्च2019मध्ये इंग्लंडमध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला. या सामन्यात 32 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी मिताली उपलब्ध असणार आहे. त्यामुळं तिला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते.

वाचा-मितालीची टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, एका स्वप्नपूर्तीसाठी घेतला निर्णय

टी-20साठी मिताली नाही चांगली

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी मिताली राज टी-20 क्रिकेटसाठी योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला, “मिताली राज शानदार खेळाडू आहे. पण टी-20 करिअरबाबत तिनं विचार करण्याची गरज आहे. टी-20 वर्ल्ड कप अवघ्या सहा महिन्यांवर आला आहे. त्यामुळं नव्या दमाच्या खेळाडूंनी संधी देण्याची गरज आहे”, अशी माहिती दिली होती. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपसाठी मिताली राजला पसंती नसल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळेच मितालीनं निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला असावा.

वाचा-बॅट सोडून शिखर धवनने हातात धरली बासरी, ऐकून तुम्हीही व्हाल चाहते

हरमनप्रीतशी होणाऱ्या मतभेदांमुळं घेतली निवृत्ती?

2018मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमध्ये मितालीनं चांगली खेळी केली होती. भारतीय संघानं सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. दरम्यान, एका सामन्यादरम्यान मिताली जखमी झाली, त्यानंतर ग्रुप स्टेजमध्ये मितालीला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर मितालीचे संघात पदार्पण होईल असे वाटत असताना मितालीची प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवड झाली नाही. त्यामुळं भारताला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर हरमनप्रीत आणि मितालीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

वाचा-7 वर्षांच्या मुलाच्या ऑटोग्राफसाठी विराटही थांबला, अनुष्कानं दिली 'ही' रिअॅक्शन

2021 वर्ल्ड कपसाठी निवृत्तीचा घेतला निर्णय

मितालीनं निवृत्तीचे कारण सांगते, 2021मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. देशासाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी माझे योगदान देऊ इच्छिते. मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या बीसीसीआयचे मी आभार मानते. भारताच्या टी-20 संघाला मी शुभेच्छा देते”, असे सांगितले.

वाचा-क्रिकेटमधील ऐतिहासिक घटना, 12 सामन्यात भारतीय क्रिकेटपटू पोहचला तिसऱ्या स्थानी

VIDEO : बाबा रामदेव यांच्या मेळाव्यात दुकानदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2019, 7:55 PM IST
Tags: mitali raj

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading