महिला वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर,मिथाली राजकडे धुरा

महिला वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर,मिथाली राजकडे धुरा

इंग्लडमध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कप 2017 साठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीये. मिथाली राजकडे टीमचं नेतृत्त्व कायम ठेवण्यात आलंय

  • Share this:

15 मे : इंग्लडमध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कप 2017 साठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीये. मिथाली राजकडे टीमचं नेतृत्त्व कायम ठेवण्यात आलंय.

15 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात आलीये. 300 रन्सची रेकॉर्ड भागीदारी करणाऱ्या पूनम राऊत आणि दीप्ती शर्माचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. 24 जूनपासून इंग्लडमध्ये महिला वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. भारताची पहिली लढत इंग्लड विरुद्ध असणार आहे.

अशी आहे टीम इंडिया

मिथाली राज -(कर्णधार), हरमनप्रित कौर, वेदा कृष्णमुर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा,झुलन गोस्वामी, शिखा पांडे,एकता बिश्त,सुषमा वर्मा,मानसी जोशी,राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव,नुझात परवीन,स्मृती मानधना

First published: May 15, 2017, 9:56 PM IST

ताज्या बातम्या