महिला वनडे क्रिकेटमध्ये मिताली 'राज', 6000 धावांचा टप्पा केला पार

महिला वनडे क्रिकेटमध्ये मिताली 'राज', 6000 धावांचा टप्पा केला पार

मिताली राज 6000 रन्सचा टप्पा गाठणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.

  • Share this:

12 जुलै : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये जो रेकाॅर्ड रचलाय त्याची बरोबरी भारतीय महिला टीमची धडाकेबाज कॅप्टन मिताली राजने केलीये. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवण्याची रेकाॅर्डब्रेक कामगिरी मितालीने केली आहे.

मितालीने हा रेकाॅर्ड आज काऊंटी ग्राऊंडवर सुरू असलेल्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यात केला आहे. एवढंच नाहीतर 6000 रन्सचा टप्पा गाठणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.

आजच्या सामन्यामध्ये मिताली जेव्हा मैदानात उतरली तेव्हा ती रेकाॅर्डपासून 34 रन्स दूर होती. 35 रन्सची शानदार खेळी करत अखेर मितालीने रेकाॅर्ड रचला. मितालीने इंग्लंडचा माजी कॅप्टन चार्लोट एडवर्डचाही रेकाॅर्ड मोडलाय. एडवर्डने 191 सामन्यामध्ये 38.16 च्या अव्हरेजनुसार 5992 रन्स केले होते. तर मितालीने फक्त 183 सामन्यात हा रेकाॅर्ड मोडलाय.

एवढंच नाहीतर महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकाची रेकाॅर्डही मितालीच्या नावावर आहे. मितालीने आतापर्यंत 48 अर्धशतकं ठोकली आहे.

First published: July 12, 2017, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading