क्रिकेटमध्ये पती-पत्नीचा अनोखा योगायोग, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल कमालच झाली

क्रिकेटमध्ये पती-पत्नीचा अनोखा योगायोग, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल कमालच झाली

अॅशेसमध्ये जेव्हा मिशेल स्टार्कनं विकेट घेतली त्याचवेळी 3 हजार किलोमीटर दूर त्याच्या पत्नीनंही मैदान गाजवलं.

  • Share this:

मँचेस्टर, 09 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियानं मँचेस्टरवर चौथ्या कसोटीत इंग्लंडला 185 धावांनी पराभूत केलं. यासह त्यांनी अॅशेस ट्रॉफी आपल्याकडेच राखली. ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात मॅनचेस्टर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला संधी मिळाली होती.

चौथ्या कसोटी सामन्यात स्टार्कनं चार विकेट घेतल्या. यातील तीन विकेट पहिल्या डावात तर एक विकेट दुसऱ्या डावात घेतली. यात एक अनोखा योगायोग घडला. ज्यावेळी स्टार्कनं विकेट घेतली. तेव्हाच त्याची पत्नी एलिसानं हीलीनं विंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात चौकार मारला. एकाच वेळी झालेल्या घटनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कमेंटेटर लिजा स्टालेकेरनं ट्विटरवर शेअर केला आहे.

स्टार्कची पत्नी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात आहे. एलिसानं अँटिगुआत झालेल्या सामन्यात खेळताना 43 चेंडूत 58 धावा केल्या. यात तिनं दहा चौकार आणि एक षटकार मारला. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात 308 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजला 157 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीनं सर्वाधिक 112 धावा काढल्या.

एलिसा आणि मिशेल स्टार्क यांनी दोन वर्षांपुर्वी लग्न केलं होतं. दोघेही वयाच्या नवव्या वर्षापासून एकमेकांना ओळखतात. त्यांची ओळख एका सामन्यात झाली होती ज्यामध्ये दोघेही एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यानंतर दोघेतही अंडर 11 संघात यष्टीरक्षक होते.

'स्मिथ कितीही चांगला खेळलास तरी तुम तो धोकेबाज हो', क्रिकेटपटूनं केली टीका

बुमराहवर रबाडाची टीका, 'गोलंदाजी जबरदस्त पण...'

वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 9, 2019, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading