मितालीला हवंय महिला आयपीएल पण बीसीसीआयचा मात्र नकार

मितालीला हवंय महिला आयपीएल पण बीसीसीआयचा मात्र नकार

आपण मितालीशी सहमत असून महिला क्रिकेटच्या वाढीसाठी पावलं उचलली जातील असं आश्वासन मात्र बी.सी.सी.आयने दिलंय.

  • Share this:

26 जुलै : आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या मिताली राजने भारतातील महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल असावे अशी इच्छा  व्यक्त केली होती. पण सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महिला आय.पी.एल शक्य नाही असं बीसीसीआयचं म्हणणं आहे.

रविवारी वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर मिताली राजने भारतीय महिला क्रिकेटपटूंची परिस्थिती सुधारावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तसंच त्यांना पुरूष क्रिकेटपटूंसारखाच आदर मिळावा अशी इच्छाही तिने व्यक्त केली होती. भारतीय महिला क्रिकेटपटूंना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या असंही ती म्हणाली. त्यातच महिला क्रिकेटच्या वाढीसाठी आय.पी.एल.ही घेण्यात यावं अशीही इच्छा तिने व्यक्त केली.

पण बीसीसीआयची सध्याची परिस्थिती पाहता महिला आय.पी.एल घेता येणार नाही अशी माहिती बीसीसीआयने दिली. पण आपण मितालीशी सहमत असून महिला क्रिकेटच्या वाढीसाठी पावलं उचलली जातील असं आश्वासन मात्र बीसीसीआयने दिलंय.

First published: July 26, 2017, 2:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading