PHOTOS 'हिच्या'पुढे धोनी, विराटचे रेकॉर्डही पडतील फिके; कोण आहे ही महिला खेळाडू?

धोनी आणि विराट हे धावांचा पाठलाग करताना जगातले सर्वोत्तम फिनिशर समजले जातात. जगातल्या या बेस्ट फिनिशरची कामगिरीही फिकी पडेल असे रेकॉर्ड भारताच्याच एका महिला खेळाडूच्या नावावर आहे.

  • Share this:

महेंद्रसिंग धोनी हा भारताला लाभलेला एक यशस्वी कॅप्टन आणि अजूनही टॉपचा फिनिशर मानला जातो. कोहलीसुद्धा धोनीपाठोपाठ काकणभर सरस कामगिरी करत स्मार्ट फिनिशर आणि सक्सेसफुल कॅप्टन ठरतोय.

जगातल्या या बेस्ट फिनिशरची कामगिरीही फिकी पडेल असे रेकॉर्ड भारताच्याच एका महिला खेळाडूच्या नावावर आहेत.

भारतीय टीमला धावांचा पाठलाग करण्यात सर्वांत चांगली टीम मानलं जातं. चेजिंग मास्टर असलेल्या भारतीय टीमची मदार असते धोनी, कोहली अशा खेळाडूंवर. ते वर्ल्ड बेस्ट फिनिशर मानले जातात.

विराट कोहलीने आतापर्यंत वन डे मध्ये 39 शतकं ठोकली आहेत, त्यातली 24 धावांचा पाठलाग करताना ठोकलेली आहेत. यावरून त्याच्या चेजिंग कपॅसिटीची जाणीव होईल.

पण धावांचा पाठलाग करण्यात धोनी आणि विराटला मागे टाकणारी महिला क्रिकेटपटू भारताकडेच आहे हे विशेष.

मिताली राज ही खेळाडू सर्वोत्कृष्ट चेजर मानली जाते. धावांचा पाठलाग करताना विराटची कामगिरी असते 98.23 तर धोनीचा स्ट्राईक रेट असतो 103.07. मिताली राज मात्र यापेक्षा अधिक गतीने धावा करते आणि तिचं रेकॉर्ड आहे 111.29.

मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या मॅचमध्ये खेळताना मिताली राजने नाबाद 63 धावा केल्या आणि भारतीय टीमच्या विजयात मोठा वाटा उचलला. भारताने या मॅचसह न्यूझीलंडविरुद्धची सीरिज जिंकली आहे आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

मिताली राजचं नाव मध्यंतरी गाजत होतं प्रशिक्षक रमेश पोवारबरोबर झालेल्या वादामुळे. त्याविषयी खालच्या फोटोंमध्ये....

भारताची महिला क्रिकेटची माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू मिताली राजने टीमचे प्रशिक्षक रमेश पोवारवर अपमानित केल्याचा आरोप केला. तसेच बीसीसीआयच्या प्रशासक समितीची सदस्य डायना इडल्जींवर भेदभाव केल्याचाही आरोप केला.

मिताली राजने बीसीसीआयला पत्र लिहित म्हटले की, ‘माझा हरमनप्रीत कौरसोबत कोणताही वाद नाही. मात्र मी प्रशिक्षक रमेश पोवारच्या निर्णयासोबत नाही. रमेश पोवारने मला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संघात न घेण्याचा निर्णय घेतला आणि हरमनप्रीतने त्या निर्णयाला दुजोरा दिला. मला देशासाठी वर्ल्डकप जिंकायचे होते. आम्ही चांगली संधी गमावली याचं मला दुःख आहे.’

मितालीने पोवारविरुद्ध लिहिले की, ‘जर मी त्यांच्या आजूबाजूला बसलेले असेन तर ते तिथून उठून निघून जायचे. तसंच सरावावेळी दुसऱ्यांची फलंदाजी ते आवर्जुन पाहायचे. मात्र माझ्यावेळी ते मैदानात थांबायचे नाहीत.’

‘मी त्यांच्याशी बोलायला जायचे तर ते फोनमध्येच पाहायचे किंवा तिथून निघून जायचे. ही फार अपमानास्पद होतं. हे सगळ्यांनाच दिसतं होतं की मला पार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.’

मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यातल्या वादाने आता रौद्ररुप घेतलं असलं तरी फार आधीपासून त्यांच्यात विस्तवही जात नव्हता. मितालीने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रामुळे ठिणगीचं रुपांतर वणव्यात झालं असंच म्हणावं लागेल.

टी२० वर्ल्डकपच्या न्युझीलँडविरुद्धच्या सामन्यात मिताली राज संघाचा एक भाग होती. मात्र सामन्यात पाच फलंदाज बाद झाल्यानंतरही तिला फलंदाजीसाठी मैदानात पाठवले नाही.

विशेष म्हणजे मिताली ही भारतीय संघाची सलामीवीर आहे. या सामन्यात हरमनप्रीतने शतक झळकावले होते. भारताने हा सामना जिंकला होता.

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मितालीने ५६ धावा केल्या. यावेळी हरमनप्रीत १४ धावांवर बाद झाली. भारताने हा सामनाही जिंकला.

तिसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडविरुद्ध मितालीने अर्धशतकी खेळी खेळली. या सामन्यात हरमनने फक्त ७ धावा केल्या. भारताने हा सामनाही एकहाती जिंकला होता.

यानंतर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होता. या सामन्यात मितालीला बाहेर बसवण्यात आले. मंधाना आणि हरमनप्रीतच्या फलंदाजीमुळे भारताने हा सामना जिंकला.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात मितालीला पुन्हा बाहेर बसवण्यात आले. भारतीय संघ फक्त ११२ धावा करत ऑल आऊट झाला. इंग्लंडने हा सामना जिंकला.

पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात मितालीने फलंदाजी केली नाही. तरीही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ती टॉप-४ मध्ये आहे. तिने दोन सामन्यात १०७ धावा केल्या. हरमनप्रीतने पाचही सामन्यात फलंदाजी करत १८३ धावा केल्या.

उपांत्य फेरीत मितालीला संघा बाहेर ठेवल्यानंतरच हा वाद सर्वांच्या समोर आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 08:35 AM IST

ताज्या बातम्या