मिताली राज भारतातील सर्वात प्रभावशाली महिला

मिताली राज भारतातील सर्वात प्रभावशाली महिला

बीबीसीच्या सर्वेक्षणानुसार मिताली राज भारताची सर्वात प्रभावशाली महिला ठरली आहे.

  • Share this:

28 सप्टेंबर: आज नवरात्रीतला महत्त्वाचा दिवस, आज अष्टमीची पूजा आहे. तसंच आज घरोघरी कुमारिकांची पूजाअर्चा केली जाते. तर भारताची नवदुर्गा भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. बीबीसीच्या सर्वेक्षणानुसार मिताली राज भारताची सर्वात प्रभावशाली महिला ठरली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचं नाव बीबीसीकडून जाहीर करण्यात आलंय. 2017 च्या जगभरातल्या सर्वाधिक यशस्वी महिलांमध्येही मितालीचा समावेश झालाय. याशिवाय या यादीत इरा त्रिवेदी , आदिती अवस्थी , तुलिका किरण यांचंही नावं आहे. भारतीय महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे. तर जगभरातील श्रीमंत टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा पोचलीय. भारतात अभिनेत्री मानधनासाठी नेहमीच दुय्यम स्थानावर असतात पण प्रियांका चोप्रानं मात्र हे खोटं ठरवलंय. क्वांटिको या आंतरराष्ट्रीय मालिकेमुळे प्रियांका चोप्रा घराघरात पोचली.नुकतीच फोर्ब्स मासिकानं जाहीर केलेल्या जगभरातील श्रीमंत टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत प्रियांका चोप्राचं नाव आठव्या स्थानावर आहे. प्रियांकाच्या जगभरातील चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठ्या आनंदाची बातमी आहे.

First published: September 28, 2017, 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading