Home /News /sport /

पाकिस्तानमध्ये 'बळीचा बकरा' शोधला जातो, INDvsPAK मॅचपूर्वी माजी कॅप्टनचा घरचा आहेर

पाकिस्तानमध्ये 'बळीचा बकरा' शोधला जातो, INDvsPAK मॅचपूर्वी माजी कॅप्टनचा घरचा आहेर

तर पाकिस्तानमध्ये 'बळीचा बकरा बनविले' जाते; पाकच्या खेळाडूचा मोठा खुलासा

तर पाकिस्तानमध्ये 'बळीचा बकरा बनविले' जाते; पाकच्या खेळाडूचा मोठा खुलासा

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या महामुकाबल्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक मिस्बाह उल हकने (Misbah-ul-Haq) पाकिस्तान क्रिकेटवर ताशेरे ओढले.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या महामुकाबल्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक मिस्बाह उल हकने (Misbah-ul-Haq) पाकिस्तान क्रिकेटवर ताशेरे ओढले. अपेक्षित निकाल न मिळाल्यास बळीचा बकरा बनविले जाते. असा गंभीर आरोप करत मिस्बाह यांनी पाकिस्तान क्रिकेटचा चांगलाच समाचार घेतला आहे. काही दिवसापूर्वी मिस्बाह यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ए-स्पोर्ट्स’ संस्थेशी संवाद साधताना मिस्बाह यांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं वातावरण कसे आहे याचे चित्र स्पष्ट केले आहे. बाबर आझमला बसले दोन मोठे धक्के, भारताविरुद्ध सलग सहावा पराभव नक्की! पीसीबीत हुजरेगिरी करणाऱ्यांना मोठा मान मिळतो असा आरोप करत पीसीबीची खरी समस्या म्हणजे आमचे क्रिकेट केवळ निकाल बघते. पुढील योजना राबविण्यास आणि व्यवस्था सुधारण्यास थोडा वेळ लागतो, हे समजून घेण्यास आमच्याकडे वेळ आणि संयम नाही. आमच्या खेळाडूंचा विकास स्थानिक पातळीवरच करावा लागेल, नंतरच राष्ट्रीय संघात त्यांच्या कौशल्याला वाव मिळू शकेल, याकडे आमचे लक्ष नाही. आम्हाला झटपट निकाल हवे असतात, ते मिळाले नाहीत तर कुणालाही बळीचा बकरा बनविण्यास आम्ही तयारच असतो, असा आरोप मिस्बाह यांनी यावेळी केला. तसेच,दुर्दैवाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये बळीचा बकरा शोधणे, आता सामान्य बाब झाली आहे. एक सामना किंवा मालिका गमावल्यानंतर स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी आम्ही बळीचा बकरा शोधतो. हीच कॉस्मेटिक सर्जरी होत राहिली तर काहीही बदलणार नाही! तुम्ही कोच आणि खेळाडूंना बदलू शकता, मात्र आतील समस्या जशीच्या तशी कायम राहील. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. विराट कोहलीनं केली 5 वर्षांनी बॉलिंग, स्मिथला आवरलं नाही हसू पाहा VIDEO गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजमधून परतल्यानंतर मिस्बाहसह गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनीदेखील अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिस्बाह आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यांची नियुक्ती 2019 मध्ये करण्यात आली होती. करारानुसार या दोघांचाही अजून एक वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता. पण त्यापूर्वीच दोघांनी राजीनामा दिला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: India vs Pakistan, Pakistan, Pakistan Cricket Board, T20 cricket, T20 league, T20 world cup

    पुढील बातम्या