Elec-widget

मिठाई तर सोडाच आता बिर्याणीही मिळणार नाही, क्रिकेटपटूंचे होणार हाल!

मिठाई तर सोडाच आता बिर्याणीही मिळणार नाही, क्रिकेटपटूंचे होणार हाल!

अनफिट संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संघाविरोधात भलतेच फर्मान काढण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : क्रिकेट किंवा कोणताही खेळ असला तरी त्यात खेळाडूंची तंदुरूस्ती खुप महत्त्वाची असते. त्यासाठी खेळाडू कठिण डायट आणि व्यायामही करतात. मात्र अनफिट संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संघाविरोधात भलतेच फर्मान काढण्यात आले आहेत. त्यामुळं आता यापुढे या संघाचे जिभेचे चोचले नव्या प्रशिक्षकाने बंद केले आहेत. हा संघ आहे पाकिस्तानचा क्रिकेट संघ.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आणि निवड समिती अध्यक्षपदी माजी कर्णधार मिस्बाह उल हकची नुकतीच निवड करण्यात आली. दरम्यान मिस्बाहनं आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच पाकिस्तानच्या खेळाडूंना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर वर्ल्ड कप 2019मध्ये अनेकांनी टीका केली. त्यामुळे मिस्बाहने बिर्याणी आणि त्यासारख्या खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचे आदेश खेळाडूंना दिले आहेत. मिस्बाहच्या निवडीनंतर पहिल्या सराव शिबीरातच त्यानं खेळाडूंच्या फिटनेसच्या मुद्द्यावर भर दिला. त्यामुळं बिर्याणी, तेलकट पदार्थ किंवा गोड पदार्थ यांवर थेट बंदी घालण्यात आली. एवढेच नाही तर खेळाडू काय जेवतात याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळं हे नियम मोडल्यास खेळाडूंना मोठा फटका बसू शकतो.

वाचा-संघावर झाला होता फिक्सिंगचा आरोप, माजी क्रिकेटपटूनं केली आत्महत्या?

मिस्बाहची मुख्य प्रशिक्षकपदी तर वकार युनिस हा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे दोघं पाकिस्तान संघाला प्रशिक्षण देतील. वर्ल्ड कप 2019मध्ये पाकिस्तान संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळं पीसीबीनं लगेचच संघ व्यवस्थापनावर भर देण्यास सुरुवात केली आहे. मे 2017मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मिस्बाहनं प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुकता दाखवली होती.

Loading...

वाचा-पी.व्ही. सिंधूला मिळाली अपहरणाची धमकी, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरोधात बऱ्याच कालावधीनंतर घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे. त्यासाठी संभाव्य संघाची निवृ करण्यात आली आहेत. यात सरफराज अहमदकडेच कर्णधारपद असणार आहे तर बाबर आझम संघाचा उपकर्णधार असेल.

कायदे आझम ट्रॉफीमध्ये लागू झाला नियम

कायदे आझम ट्रॉफी (Quaid E Azam Trophy) लीगमध्ये खेळाडूंच्या खानपानाची व्यवस्था करणाऱ्या कंपनीनं, "खेळाडूंना यापुढे अरब बिर्याणी किंवा तेलयुक्त पदार्थ देण्यात येणार नाही आहेत", असे सांगितले. त्यामुळं खेळाडूंना फक्त पास्ता खायला मिळणार आहे.

वाचा-दुसरा टी-20 पाहण्यासाठी आहात उत्सुक? पण त्याआधी जाणून घ्या मोहालीचे हवामान

VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...