वडील मजूर, पुरात वाहून गेले घर तरी आपल्या जिद्दीच्या जोरावर टीम इंडियात मिळवलं स्थान!

वडील मजूर, पुरात वाहून गेले घर तरी आपल्या जिद्दीच्या जोरावर टीम इंडियात मिळवलं स्थान!

क्रिकेट खेळण्यासाठी सध्या खेळाडू देश सोडत असताना, या खेळाडूनं मात्र कष्टानं आपलं स्थान मिळवलं.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या वतीनं बांगलादेश विरोधात होणाऱ्या एसीसी एमर्जिंग कपसाठी संघाची घोषणा केली. या संघात केरळच्या 20 वर्षीय फलंदाज मिन्नू मणि हिची महिला संघात निवड करण्यात आली आहे. मिन्नू डाव्या हाताची फलंदाज असून, पार्ट टाईम फिरकी गोलंदाजही आहे. याशिवाय मिन्नू एक उत्कृष्ठ फिल्डरही आहे.

याचवर्षी मिन्नू अंडर 23 एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफीमध्ये खेळली होती. या स्पर्धेत मिन्नूनं 188 धावा केल्या होत्या, त्याचबरोबर 11 विकेट घेतल्या होत्या. यंदा मिन्नूची केरळ क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ज्युनिअर क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार देण्यात आला होता. तिच्या कामगिरीच्या जोरावर मिन्नूला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

पुरात वाहून गेले होते घर, तरी सोडले नाही क्रिकेट

मिन्नू वायनाडच्या कुरिचिया या आदिवासी जमातीतील आहे. मिन्नूचे वडील मजूर असून घरची परिस्थितीही हालाकिची आहे. त्यामुळं 20 वर्षांच्या मिन्नूला क्रिकेट खेळण्यासाठी मुलांना गयावया करावी लागली होती. दरम्यान मिन्नूच्या घरच्यांनी सर्वात वाईट काळ पाहिला तो गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या पुरात. केरळमध्ये आलेल्या पुरात मिन्नूचे घर वाहून गेले होते. त्यावेळी पैसे जमवून त्यांनी घर पुन्हा उभे केले. त्यानंतर मिन्नूनं पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

वाचा-वादळाचं दुसरं नाव मोहम्मद शमी! 5 विकेटसह 'या' विक्रमांवर कोरले नाव

वाचा-'...तर काही वर्षांआधीच मी ओपनिंग केली असती', रोहित शर्मानं केला गौप्यस्फोट

ओपन ट्रायलनंतर झाली निवड

मिन्नूसाठी क्रिकेट हेच जीवन होते, त्यामुळं तिनं कधी क्रिकेटकडे दुर्लक्ष केले नाही. त्यासाठी मिन्नूला मनथवाडी येथील सरकारी शाळेत दाखल करण्यात आले. या शाळेत मिन्नूला क्रिकेटचे खरे धडे मिळाले. मिन्नूला शालेय दिवसात एलसम्मा अनमोल बेबी या क्रिकेटरनं ट्रेनिंग दिली. त्यानंतर मिन्नूला ओपन ट्रायल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दाखल करण्यात आले. तेथे मिन्नूची निवड झाली, त्यानंतर तिनं मागे वळूण पाहिले नाही.

वाचा-टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 07:48 AM IST

ताज्या बातम्या