ऑलिम्पिकमध्ये अनवाणी पळणारे ‘फ्लाईंग सिख’ का होते इतके लोकप्रिय? जाणून घ्या

ऑलिम्पिकमध्ये अनवाणी पळणारे ‘फ्लाईंग सिख’ का होते इतके लोकप्रिय? जाणून घ्या

कोरोनामुळं त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली. अन् उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

  • Share this:

मुंबई 19 जून: भारताचे महान माजी धावपटू ‘फ्लाईंग सिख’ (flying sikh) अशी ओळख असलेले मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचं निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मोहालीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Milkha Singh passes away) कोरोनामुळं त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली. अन् उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मिल्खा सिंग यांच्या निधनामुळं देशभरात शोककळा पसरली आहे. अगदी बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत विविध क्षेत्रातील लोकांनी सोशल मीडियाद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. परंतु मिल्खा सिंग इतके प्रसिद्ध का होते? देशभरात असेल शेकडो धावपटू आहे. पण त्यांच्यात मिल्खा सिंग इतके लोकप्रिय का झाले? जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

पराभवानंतरही तब्बल 40 वर्ष कायम होता मिल्खा सिंग यांचा 'तो' रेकॉर्ड

  1. मिल्खा सिंग यांचा जन्म 1929 साली पंजाब प्रांतातील मुझ्झफरगढ या ठिकाणी झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुझफरगढ हे ठिकाण पाकिस्तानचा भाग म्हणून घोषित करण्यात आलं.

  1. ‘फ्लाईंग सिख’ या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांनी 1960 (रोम) व 1964 (टोकियो) साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

  1. मिल्खा सिंग यांनी कुठल्याही सरावाशिवाय ऑलिम्पिकमध्ये 400 मीटरचं अंतर केवळ 45.9 सेकंदात पार केलं होतं. त्यांचा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही.

मिल्खा सिंग यांना Flying Sikh नाव का पडलं? धावपटूला आयुष्यात या गोष्टीची नेहमी राहिली खंत

  1. पटियाला येथे 1956 साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ते पहिल्यांदा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. 200 व 400 मीटर शर्यंतीत त्यांनी विक्रमी वेळ नोंदवली होती.

  1. 1958 साली टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत 200 व 400 मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.

  1. ६ सप्टेंबर 1960 साली ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 400 मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी 0.1 सेकंदानं त्यांचं कास्य पदक हुकलं होतं. त्या स्पर्धेत कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय ते धावले होते.

  1. 1958 साली झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत 200 व 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं.

  1. जिंकलेली सर्व पदकं, चषक, ब्लेझर व आपले विक्रमी बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले.

  1. त्या काळात मिल्खा सिंग हे देशभरातील तरूणांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व होते. अभुतपूर्वक कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Published by: Mandar Gurav
First published: June 19, 2021, 8:55 AM IST

ताज्या बातम्या