Home /News /sport /

किवींसाठी धक्कादायक बातमी; Kane Williamsonवर होणार शस्त्रक्रिया!

किवींसाठी धक्कादायक बातमी; Kane Williamsonवर होणार शस्त्रक्रिया!

Kane Williamson

Kane Williamson

टीम इंडियाविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर किवींसाठी (New Zealand )आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  नवी दिल्ली, 6 डिसेंबर: मुंबईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand) न्यूझीलंडला मोठ्या फरकाने टीम इंडियाकडून पराभव स्विकारावा लागला. भारतीय टीमने 372 रननं दणदणीत विजय मिळवला. पराभवाच दुःख पचवण्यापूर्वीच किवींसाठी (New Zealand )आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केन विल्यमसन दुखापतीमुळे मुंबई कसोटी खेळू शकला नाही. केन विल्यमसनच्या(Kane Williamson) कोपराचे दुखणे पुन्हा उद्भवले आणि संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली. दरम्यान, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन(Former New Zealand coach Mike Hesson) यांनी चिंता व्यक्त केली आहे. किवी कर्णधाराला काही काळ क्रिकेट सोडावे लागेल, असे मत माईक हेसन यांनी व्यक्त केले आहे.

  Kane Williamsonवर होणार शस्त्रक्रिया!

  माईक हेसनने माजी किवी क्रिकेटपटू इयान स्मिथशी झालेल्या संवादात सांगितले की, विल्यमसनला कोपराच्या दुखण्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार असल्याचे म्हटले आहे. हेसन म्हणाले, 'मला वाटते की विल्यमसन अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. मला माहित आहे की विल्यमसन खूप अस्वस्थ असेल कारण त्याला भरपूर विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याची कोपर अजून बरी झालेली नाही. विल्यमसनने गेल्या 18 महिन्यांत अनेक सामने गमावले आहेत. हेसन पुढे म्हणाले, 'विलियमसनला नुकतीच हिपची दुखापत झाली होती पण त्याच्या कोपराची दुखापत बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मला वाटते की त्याला एक वेळ निवडावी लागेल आणि ऑपरेशन करावे लागेल. काही काळ क्रिकेटपासून दूर राहिल्याने तो दुखापतीतून पूर्णपणे मुक्त होईल. असे मत हेसन यांनी व्यक्त केले आहे. न्यूझीलंडला आता जानेवारीपासून क्रिकेट खेळायचे आहे. संघ बांगलादेशविरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे ज्यात केन विल्यमसन विश्रांती घेऊ शकेल. मात्र, त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाकडून 3 वनडे आणि एक टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार असून त्यामध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर मार्चमध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: New zealand, Team india

  पुढील बातम्या