• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • वार्मअप मॅच मधील Team India ची खेळी पाहून मायकल वॉनचा यु-टर्न

वार्मअप मॅच मधील Team India ची खेळी पाहून मायकल वॉनचा यु-टर्न

वार्मअप मॅच मधील Team India ची खेळी पाहून इंग्लंडचा Michael Vaughan भलताच खुश

वार्मअप मॅच मधील Team India ची खेळी पाहून इंग्लंडचा Michael Vaughan भलताच खुश

टीम इंडियावर (Team India) सातत्याने टीका करणारे व तोंडसुख घेणारे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यांचे टीम इंडियाची वार्मअप मॅचमधील जोरदार कामगिरी पाहूता मत परिवर्तन झाल्याचे दिसून आले.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात झाली असून तत्पूर्वी वार्मअप मॅच (warm up match)खेळवण्यात येत आहेत. दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासोबत टीम इंडियाचे वार्मअप मॅच खेळवण्यात आली असून टीम इंडियाने (Team India) दोन्ही सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी केली. ही कामगिरी पाहून टीम इंडियावर सातत्याने टीका करणारे व तोंडसुख घेणारे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) प्रभावित झाले आहेत. त्यांनी ट्विट करत टीम इंडियाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. टीम इंडियाने सोमवारी पहिल्या वार्मअप मॅचमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला आणि नंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून पराभूत केले. टीम इंडियाची विजयी घोडदौड पाहता क्रिकेट जगतात यंदाच्या टी20 वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जात आहे. दरम्यान, नेहमी टीम इंडियाला कमी लेखणारे इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन भलतेच प्रभावित झाले आहेत. त्यांनी ट्विट करत विराट संघाचा उल्लेख हॉट फेव्हरेट असा केला आहे. नेहमी शेकडो ट्विट करत भारताला हिणवण्याचा प्रयत्न करत असतात, पण टीम इंडियाचे तोंडभरुन कौतुक केले. ''ज्या प्रकारे भारत सराव खेळ खेळत आहे ते सूचित करत आहे की, यंदाच्या टी20 वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार ठरु शकतात.'' अशा आशयाचे ट्विट वॉन यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट पाहून क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी, वॉनने इंग्लंडला फेव्हरिट असल्याचे सांगितले होते. पण आता, त्यांचे मत परिवर्तन झाल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सामन्यात रोहितने नाबाद 60 धावा केल्या, तर सलामीवीर केएल राहुलने 39 धावा आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 38 धावा केल्या. तसेच हार्दिक पंड्याने 8 चेंडूत 14 धावा करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. टीम इंडिया 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात करणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: