• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कोच जस्टिन लँगरविरुद्ध टीमचं उघड बंड, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ!

कोच जस्टिन लँगरविरुद्ध टीमचं उघड बंड, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वादळ

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वादळ

ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगर (Justin Langer) कडक शिस्तीचा आहे आणि खेळाडूंसमोर सत्य ठेवण्यात तो अजिबात मागे पुढे पाहत नाही, याच कारणामुळे खेळाडूंनी त्याच्याविरुद्ध बंड केलं आहे, असा आरोप होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट : एकेकाळी क्रिकेट विश्वावर राज्य गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा (Australia Cricket) बांगलादेश दौऱ्यातल्या 5 मॅचच्या टी-20 सीरिजमध्ये पराभव झाला, यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधले वाद समोर आले आहेत. यातच आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन (Michael Vaughan) याने आगीत तेल ओतायचं काम केलं आहे. ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगर (Justin Langer) कडक शिस्तीचा आहे आणि खेळाडूंसमोर सत्य ठेवण्यात तो अजिबात मागे पुढे पाहत नाही, याच कारणामुळे खेळाडूंनी त्याच्याविरुद्ध बंड केलं आहे, असा दावा मायकल वॉन याने केला आहे. मायकल वॉनने आपल्या फेसबूक पेजवर याबाबत लिहिलं आहे. इंग्लंडसाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण वर्षाच्या शेवटी त्यांना ऑस्ट्रेलियाच्याविरुद्ध ऍशेस (The Ashes) सीरिज खेळायची आहे, त्यातच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये खराब निकाल येत आहेत. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सीरिज हे याचं उदाहरण आहे. खेळाडू कठोर शिस्तीच्या लँगरविरुद्ध बंड करत आहेत, असं दिसतंय. यामुळे टीमच्या अडचणी वाढल्या आहेत, असं वॉन म्हणाला. 'लँगर कडक शिस्तीचा आहे, यात काहीही शंका नाही. खेळाडू म्हणूनही तो मैदानात असाच होता. तो स्वत:चं व्यक्तीमत्व पूर्ण बदलू शकत नाही. ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये विश्वासाचं नातं तुटलं आहे,' अशं वॉनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 'ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जगभरात फ्रॅन्चायजी क्रिकेट खेळतात, जिथलं वातावरण दिलासादायक असतं. निकालांवर एवढा हल्लाबोल होत नाही. त्यामुळे या खेळाडूंना लँगरची कडक शिस्त पटत नसेल,' असं वॉन म्हणाला.
  Published by:Shreyas
  First published: