News18 Lokmat

रोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना?’

खुद्द रोहित शर्माला देखील विश्वास बसणार नाही अशा या बातमीवर तुम्ही देखील हसाल.

News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2019 02:09 PM IST

रोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना?’

नवी दिल्ली, 21 जानेवारी: भारतीय संघातील सर्वात आक्रमक फलंदाज असलेल्या हिटमॅन रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश झाला आहे. हो खुद्द रोहितला देखील विश्वास बसणार नाही अशा या बातमीवर तुम्ही देखील हसाल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने भारताच्या ऑल टाईम कसोटी संघात रोहितचा समावेश केला आहे. क्लार्कच्या या निवडीवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे खुद्द रोहितच्या डायहार्ट चाहत्यांनी देखील क्लार्कने त्याचा समावेश कसोटी संघात केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

क्लार्कने तयार केलेल्या ऑल टाईम कसोटी संघात सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, एम.एस.धोनी, कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि झहीर खान यांचा समावेश केला आहे. क्लार्कने ट्विटवर पोस्ट केलेल्या या संघाच्या यादीवर नेट युझर्सनी क्लार्कने कोणत्या आधारावर रोहित शर्माची निवड केली असा सवाल केला आहे. धक्कादायक म्हणजे क्लार्कने या संघात व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा समावेश केला नाही. लक्ष्मण शिवाय भारतीय कसोटी संघाचा विचार देखील कोणी करणार नाही, असे असताना क्लार्कने रोहितला मात्र संघात स्थान दिले आहे.ट्विटरवर @sarath_lavu या युझरने क्लार्कला, तु खरच रोहितचा समावेश कसोटी संघात केला आहेस का?, असा प्रश्न केला आहे. खुद्द रोहित देखील यावर हसेल. मी रोहितचा मोठा चाहता आहे. पण त्याचा कसोटी संघात समावेश होऊ शकत नाही. हा व्हिडिओ Hublotने प्रसिद्ध केल्याने आणि त्याचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर रोहित असल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे का?, असा सवाल त्याने क्लार्कला विचारला आहे.

Loading...त्यावर क्लार्कने I’m glad you put 2 and 2 together and got 4 असे उत्तर दिले आहे. अर्थात क्लार्कच्या या ट्विटवर अनेकांनी रोहितच्या कसोटी संघातील समावेशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी या संघात मोहम्मद अझरुद्दीनचा का समावेश केला नाही असे देखील विचारले आहे. एका युझरने चेतेश्वर पुजारा आणि लक्ष्मण यांच्याशिवाय भारतीय कसोटी संघ पूर्णच होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

रोहित म्हटले की वनडे आणि टी-20मधील चौकार आणि षटकारांची आतिशबाजी डोळ्यासमोर येते. कसोटी हा रोहितचा प्रांत नाही हे आकडेवारी पाहिल्यावर देखील लक्षात येते. रोहितने आतापर्यंत केवळ 27 कसोटी खेळल्या आहेत. त्यात त्याने 39.62च्या सरासरीने 1 हजार 585 धावा केल्या आहेत.


VIDEO : मासे पकडण्यासाठी टाकला गळ, हाती लागला 'खजाना'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...