Home /News /sport /

तब्बल 300 कोटी पोटगी देत 'या' क्रिकेटरने घेतला घटस्फोट, असिस्टंटसोबतचे प्रायव्हेट फोटो लिक

तब्बल 300 कोटी पोटगी देत 'या' क्रिकेटरने घेतला घटस्फोट, असिस्टंटसोबतचे प्रायव्हेट फोटो लिक

Michael Clarke

Michael Clarke

सध्या क्रिकेट जगतात एका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरच्या(Australian former cricketer) घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देताना तब्बल 300 कोटी रुपये मोजले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  नवी दिल्ली, 19 जानेवारी: सध्या सेलिब्रिटींच्या जगात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकिकडे लग्नबंधनाच्या बातम्या समोर येत आहेत तर दुसरीकडे घटस्फोटाच्या बातम्यदेखील एकामागोमाग एक धडकत आहेत. अशातच सध्या क्रिकेट जगतात एका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देताना तब्बल 300 कोटी रुपये मोजले असल्याची धक्कादायक (Michael Clarke divorce )माहिती समोर आली आहे. तर या क्रिकेटचे नाव ऑस्ट्रेलियाला विश्वकप जिंकून देणारा मायकल क्लार्क(Michael Clarke) असे आहे. त्याच्या घटस्फोटाची बातमी 2012 मधील आहे. मात्र, सध्या त्यासाठी त्याला मोजाव्या लागलेल्या पैशांमुळे चर्चेत आला आहे. क्लार्क आणि त्याची पत्नी काइली यांचा 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. क्लार्क आणि काइली हे 2012 पासून एकत्र होतं. 18 महिने ते एकमेकांना डेट करत होते. क्लार्क आणि काइली हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट सर्कलमधील एक नावाजलेलं कपल म्हणून ओळख निर्माण केलेली. दोघांना केल्सी नावाची मुलगी आहे. 7 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल 300 कोटी पोटगी दिली ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार क्लार्क आणि काइलीदरम्यान झालेला घटस्फोटामध्ये पोटगीसंदर्भात निश्चित करण्यात आलेला आकडा हा 40 मिलियन डॉलर्स म्हणजेच 300 कोटी रुपयांचा आहे. घटस्फोटानंतर दोघांनीही आपआपले वेगळे मार्ग निवडले आहेत. घटस्फोटानंतर क्लार्कने नवीन घरं घेतलं आणि काइली ही क्लार्कसोबत ज्या घरामध्ये लग्नानंतर राहत होती ते घरंही या दोघींनी विकले आहे. नेमकं काय घडलं होत? असिस्टंटसोबतचे प्रायव्हेट फोटो लिक 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मायकल क्लार्कचे असिस्टंटसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. क्लार्कच्या असिस्टंटचे नाव साशा असे आहे. साशा ही मायकल क्लार्कच्या क्रिकेट अकादमीचा कारभार संभाळायची. मात्र अनेकदा या दोघांना एकत्र दिसले आहेत. Michael Clarke
  Michael Clarke
  साशासोबतच्या या कथित प्रेमप्रकरणामुळे क्लार्क अगदीच प्रकाशझोतात आला जेव्हा या दोघांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावरुन समोर आले. या फोटोंमध्ये क्लार्क आणि साशा एका खासगी लक्झरी यॉटवर एकमेकांच्या बाजूला झोपलेले दिसत आहेत. मात्र, क्लार्कने यावर अद्याप भाष्य केलेले नाही. मायकेल क्लार्कने आपल्या देशासाठी 115 कसोटी, 245 एकदिवसीय आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 8643 धावा केल्या तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सुमारे 8000 धावा केल्या आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Cricket, Cricket news, Sports

  पुढील बातम्या