हैदराबाद, 6 एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार भुवनेश्वर कुमारचा निर्णय सार्थ ठरवत फिरकीपटू मोहम्मद नबीने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं.
मोहम्मद नबीने पॉवर प्लेमध्ये टाकलेल्या चौथ्या षटकातील चौथ्याच चेंडूवर रोहित शर्माला बाद केलं. त्याने कमी वेगाने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आलेल्या रोहित शर्माने उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेवर असलेल्या दीपक हुडाने रोहितचा झेल घेतला. रोहित शर्माला 14 चेंडूत 11 धावाच करता आल्या.
M19: SRH vs MI – Rohit Sharma Wicket https://t.co/SRMz1AEWv8
— Suraj Yadav (@imyadavsuraj) April 6, 2019
पंजाब विरुद्धच्या सामन्यात धोनीनेही फिरकीपटूंचा वापर करत सामना जिंकला. 161 धावा असतानाही चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्याच षटकात फिरकीपटू हरभजन सिंगने दोन फलंदाज तंबूत धाडले. यात स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा समावेश होता.
धोनीने वेळ साधली पण नशिबाने डाव उलटला, पाहा VIDEO
Déjà vu - Dhoni creates magic, but bails still don't fall via https://t.co/BVnL6fwr48
— Suraj Yadav (@imyadavsuraj) April 6, 2019
'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'