MI vs SRH : मुंबईची प्ले ऑफमध्ये 'सुपर' एण्ट्री, सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा पराभव

MI vs SRH : मुंबईची प्ले ऑफमध्ये 'सुपर' एण्ट्री, सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा पराभव

हैदराबादला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आपला शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे: मुंबई आणि हैदराबाद यांच्यात प्ले ऑफसाठी झालेला अटीतटीचा सामना अखेर सुपर ओव्हर येऊन ठेपला. शेवटच्या चेंडूवर हेैदराबादला 7 धावांची गरज असताना मनिष पांडेनं अप्रतिम षटकार लगावला. या सुपर ओव्हरमध्ये अखेर या संघानं बाजी मारत मुंबईनं प्ले ऑफमध्ये थेट प्रवेश केला.

आयपीएलचं बारावं हंगाम शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचलं असताना, आता सध्या सर्व संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. दरम्यान आज प्लेऑफच्या शर्यतीसाठी झालेला मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद सनरायजर्स यांच्यातला सामना चांगलाच रंगला. अगदी सुपरओव्हरमध्ये आलेल्या या सामन्यात जसप्रीत बुमराहनं उत्तम गोलंदाजी करत 6 चेंडूत 9 धावा दिल्या. तर, हार्दिक पांड्यानं केवळ तीन चेंडूत हा सामना संपवला.

मुंबईनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे मात्र खलील अहमदच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईला 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना, मनिष पांडेनं पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी केली. सलामीला आलेल्या रिध्दीमान साहा आणि मार्टिन गुपतील यांनी चांगली सुरुवात दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 40 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर साहाच्या रुपात हैदराबादला पहिला झटका बसला. त्यानंतर 20-30 धावांच्या फरकानं विकेट गेल्या. मात्र, मनिष पांडे आणि मोहम्मह नाबी यांनी चांगली फलंदाजी केली.

मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 162 धावांपर्यंत मजल मारली. यात डी कॉकच्या अर्धशतकी खेळीनं मुंबईला तारलं. डी कॉकनं 58 चेंडूत 69 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईनं 160चा आकडा पार केला. दरम्यान सलामीला आलेल्या रोहितला चांगली फलंदाजी करता आली नाही, मुंबईला रोहितच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहितला 24 धावा करता आल्या. सूर्यकुमारच्या रुपात मुंबईला दुसरा धक्का बसला. सूर्यकुमारने 17 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या. लुईसच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का बसला. लुईसला एकच धाव काढता आली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न केला मात्र, तोही आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात बाद झाला. हैदराबादकडून खलील अहमदनं उत्कृष्ठ गोलंदाजी केली. 42 धावा देत 3 विकेट घेतल्या. रोहितच्या रुपात त्यानं पहिली मोठी विकेट घेतली.

VIDEO : गडचिरोली स्फोटाबाबत गाफील राहिलात का? पोलीस महासंचालक म्हणतात...

First published: May 2, 2019, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading