IPL 2019 : हार्दिकनं पळवला बंगळुरूच्या तोंडचा घास, मुंबईचा 'विराट' विजय

IPL 2019 : हार्दिकनं पळवला बंगळुरूच्या तोंडचा घास, मुंबईचा 'विराट' विजय

विराटच्या बंगळुरू संघाचं प्ले ऑफचं स्वप्न भंगलं.

  • Share this:

मूंबई, 15 एप्रिल : घरच्या मैदानावर आम्हीच शेर असे दाखवत मुंबईनं शेवटच्या षटकात सामना जिंकला. पुन्हा मुंबईसाठी हार्दिक पांड्या धाऊन आला. आणि मुंबईनं पाच विकेटनं सामना जिंकला.पहिले सहा सामने सलग हरल्यानंतर पंजाब विरोधात श्रीगणेशा केल्यानंतर बंगळुरू संघाला दुसरा गमवावा लागला. पवन नेगीच्या शेवट्या ओव्हरला तब्बल 22 धावा हार्दिकनं केल्या.

टॉस जिंकत मुंबईनं बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. एबी आणि मोईन अलीच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूनं 171 धावा केल्या. दरम्यान या धावांचा पाठलाग करत असताना मुंबईनं दणक्यात सुरु केली.

सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉक यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सलामीला आलेल्या फलंदाजांनी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोईन अलीच्या 7व्य ओव्हरनं मुंबईचा खेळ बदलला आणि बंगळुरू संघ पुन्हा गेममध्ये आला.पहिल्याच चेंडूला रोहितच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. रोहितनं 19 चेंडूंत २८ धावा केल्या. त्यानंतर लगेचच मुंबईला दुसरा धक्का बसला. क्विंटन डी'कॉक २६ चेंडूंत ४० धावा करत बाद झाल्या. त्यानंतर हार्दिकनं सगळा गेम बदलला. यामुळं विराटचं प्ले ऑफचा स्वप्न अपुर्ण राहिलं.VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 07:33 PM IST

ताज्या बातम्या