Home /News /sport /

सूर्यकुमार यादव OUT झाल्याने आकाश अंबानी निराश, व्हायरल होतीय रिअ‍ॅक्शन

सूर्यकुमार यादव OUT झाल्याने आकाश अंबानी निराश, व्हायरल होतीय रिअ‍ॅक्शन

Aakash Ambani

Aakash Ambani

आयपीएलमधली (IPL) सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा मैदानात (IPL 2022) संघर्ष करताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या पहिल्या 4 सामन्यांपैकी सगळ्या मॅचमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला.

    मुंबई, 14 एप्रिल: आयपीएलमधली (IPL) सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा मैदानात (IPL 2022) संघर्ष करताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या पहिल्या 4 सामन्यांपैकी सगळ्या मॅचमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. मुंबईला या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. अशातच संघाचे मालक आकाश अंबानी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संघाचा धडाकेबाज खेळाडू आऊट झाल्याचे आकाश यांचा चेहरा निराश झाल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवने आपल्या डावात 30 चेंडूत 43 धावा केल्या. त्यादरम्यान त्याने एक चौकार आणि चार षटकार ठोकले. 19व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने मोठा फटका खेळला झेलबाद झाला. यासह मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या आशेचा किरण मावळला. IPL 2022: धोनी किंवा रोहितनं नाही तर 18 वर्षांच्या मुलानं लगावलाय सर्वात लांब SIX सूर्यकुमार यादव 43 धावांवर खेळत होता तेव्हा सतत चौकार- षटकार मारत होता. पण त्याच वेळी सीमारेषेजवळ त्याचा झेल बाद झाला. यादरम्यान मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांची स्टँडवर आश्चर्यकारक प्रतिक्रिया लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटो मध्ये ते तणावात दिसले. र्यकुमार यादव बाद होताच आकाश अंबानी निराश झाले. सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत क्रीझवर उभा राहिला असता तर सामन्याचा निकालही मुंबईच्या बाजूने लागला असता, हे आकाश अंबानी यांना वाटत होते. मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे, ज्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सूर्यकुमार यादवने 19व्या षटकात ऑडिन स्मिथकडे झेल देऊन मोठा फटका मारला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. एकेवेळी मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल असे वाटत होते. सूर्यकुमार यादव बाद होताच आशाही भंग पावली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav

    पुढील बातम्या