IPL 2019 : दिल्लीच्या चाटवर वडापावचं ठरला सरस ! मुंबईचा 40 धावांनी विजय

राहुल चहरच्या फिरकीपुढं दिल्लीच्या गोलंदाजांनी नांगी टाकली.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 11:29 PM IST

IPL 2019 : दिल्लीच्या चाटवर वडापावचं ठरला सरस ! मुंबईचा 40 धावांनी विजय

नवी दिल्ली, 18 एप्रिल : आपल्या पराभवाचा वचपा काढत मुंबईनं दिल्लीला 40 धावांनी नमवले. 169 धावांचा पाठलाग करताना, दिल्लीच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. दिल्लीचा संपुर्ण संघ अवघ्या 125 धावांवर बाद झाला.राहुल चहरच्या फिरकीपुढं दिल्लीच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. राहुल चहरनं आपल्या 4 ओव्हरमध्ये 4.75च्या सरासरीनं केवळ 19 धावा दिल्या. राहुलनं महत्त्वाचे फलंदाज पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर यांना स्वस्तात बाद केलं.


Loading...


त्याआधी शिखर धवननं आक्रमक फलंदाजी केली खरी, पण कोणत्याही फलंदाजाला विशेष यश आले नाही. त्यानंतर अक्सर पटेलनं काहीसा प्रयत्न केला, पण त्याच्या एकाकी झुंजी पुढं दिल्लीचा संघ तारू शकला नाही. अक्सर 26 धावा करत बाद झाला.

मुंबईकडून राहुल चहरनं 3, बुमराहनं 2 तर, मलिंगा आणि कृणाल पांड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतल्या. पण आजचा दिवस गाजवला तो, फिरकी गोलंदाजांनी. दिल्लीकडूनही अमित मिश्रानं उत्तम गोलंदाजी केली.

फिरोजशहा कोटला मैदानावर मुंबई विरुद्ध दिल्ली या सामन्यात रोहित शर्मानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मुंबई मोठी धावसंख्या गाठेल असं वाटत असतानाच अमित मिश्राने रोहितचा त्रिफळा उडवला. या खेळीदरम्यान रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहित माघारी परतल्यानंतर बेन कटिंगही लवकर माघारी परतला. यानंतर फलंदाजांनी मैदानात तळ ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी रचण्यात त्यांना अपयश आलं. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या जोडीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत मुंबईला धावांचं आव्हान गाठून दिलं. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावांचं आव्हान आहे. दिल्लीकडून कगिसो रबाडाने २ तर अक्षर पटेल आणि अमित मिश्राने प्रत्येकी १-१ बळी घेतला.VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 18, 2019 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...