नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज मार्व ह्यूज (Merv Hughes) हे आज (23नोव्हेंबर) त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर सोशल मीडिवरुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच शुभेच्छुकांमध्ये आपला नंबर लावत आयसीसीने (ICC) ह्यूजला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
1985 ते 1994 या कालावधीत ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे प्रतिनिधित्त्व केलेले ह्यूज यांच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीने त्यांना अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. झुपकेदार मिशा ठेवण्याची आवड असलेले ह्यूज यांना आयसीसीने त्यांच्या मिशांवरुनच शुभेच्छा दिल्या आहेत.
The greatest moustache in cricket history?
Happy birthday, Merv Hughes! pic.twitter.com/e0S7CKGhQk — ICC (@ICC) November 22, 2021
आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ह्यूजेसचा फोटो शेअर करत हटके कॅप्शन दिली आहे. ‘क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब मिश्या? वाढदिवसाच्या शुभेच्छा मर्व ह्यूज!’ असे आयसीसीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
आयसीसीचे हे ट्विट पाहून भारतीय चाहत्यांनी भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन यांचा फोटो शेअर करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Whatabout Me, An all-rounder Abhinandan!! pic.twitter.com/okcTZiXoZd
— Vengeance Is Mine! (@PromoterBoxing) November 23, 2021
1985 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 53 कसोटी सामने खेळताना त्यांनी 212 विकेट्स आणि 1032 धावा केल्या होत्या. तसेच 33 वनडे सामन्यांमध्ये त्यांनी 38 विकेट्स आणि 100 धावा केल्या होत्या.
त्यातही वर्ष 1993मधील ऍशेस मालिकेत त्यांचे प्रदर्शन अतिशय शानदार राहिले होते. या कालावधीत त्यांनी 6 कसोटी सामन्यांमध्ये जवळपास 300 षटके गोलंदाजी केली होती आणि 31 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या या प्रदर्शनाच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-1 अशी जिंकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, Icc