मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पांढऱ्या कपड्यात महिला क्रिकेटर Periods दरम्यान कसे करतात मॅनेज?

पांढऱ्या कपड्यात महिला क्रिकेटर Periods दरम्यान कसे करतात मॅनेज?

 महिला क्रिकेटर पांढऱ्या कपड्यात पिरिएड्सचं टेंशन कसं मॅनेज करतात? खेळाडूकडून खुलासा

महिला क्रिकेटर पांढऱ्या कपड्यात पिरिएड्सचं टेंशन कसं मॅनेज करतात? खेळाडूकडून खुलासा

Test Cricket: महिला किंवा पुरुष क्रिकेटपटू या 'पांढऱ्या' ड्रेसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, महिला क्रिकेटपटूंना (Women's Cricketer) असा पांढरा ड्रेस परिधान करणे खूप भितीदायक ठरू शकते. यामागचे कारणही तसेच आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : पुरुष क्रिकेट सामन्याच्या तुलनेत खूप कमी वेळा महिलांची टेस्ट क्रिकेट (Women's Cricket Test) खेळली जाते. प्रत्येक खेडाळू महिला या सामन्यासाठी उत्सुक असते. परंतु महिला क्रिकेटर्सना या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. ज्याची जाणीव कोणालाच होत नाही. असाच एक किस्सा इंग्लँडची महिला क्रिकेटर टॅमी ब्यूमोंट (Tammy Beaumont) हिने सांगितला आहे.

टेस्ट क्रिकेटची (Test Cricket) ओळख पांढरा ड्रेस

टेस्ट क्रिकेटची खरी ओळख ही पांढरा ड्रेस असते. महिला किंवा पुरुष क्रिकेटपटू या ड्रेसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, महिला क्रिकेटपटूंना (Women's Cricketer) असा पांढरा ड्रेस परिधान करणे खूप भितीदायक ठरू शकते. यामागचे कारणही तसेच आहे. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी कोणाची पीरिएड्स सायकल संपलेली असते तर कोणाला पांढऱ्या कपड्यांवर रक्ताचे डाग लागण्याचं टेंशन असते.

'कॅप्टन कूल' MS Dhoni चं अनोखं शतक; नेटकरी म्हणतायत ‘बंदे मे अभी दम है’

इंग्लँडची महिला क्रिकेटर टॅमी ब्यूमोंटचा खुलासा

टॅमीने  एका वेबसाइटशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. टॅमी ब्यूमोंट (Tammy Beaumont talking about Period) उन्हाळी हंगामात भारताविरुद्ध कसोटी सामन्यात उतरली. तोच दिवस तिच्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता. यामुळे ती घाबरली, कारण तिने पारंपारिक पांढरा ड्रेस परिधान केला होता, जो कसोटी क्रिकेटमध्ये घातला जातो. टॅमीला काळजी वाटत होती की जर तिच्या कपड्यांवर मासिक पाळीचे डाग लागले तर ती टॉयलेट ब्रेक कसा घेऊ शकेल. टेलिव्हिजनवर लाइव्ह जाताना जर असं काही झालं तर? टॅमी ब्यूमोंटला सात वर्षांत पहिल्यात कसोटी पूर्वी इतकी चिंता वाटत होती.

'मी सलामीवीर होते, म्हणून मी पंचांना विचारले, ड्रिंक्स ब्रेकचे नियम काय आहेत? ती महिला पंच होती, म्हणून मी म्हणाले की-इट्स डे वन. त्यावर ती म्हणाली मी समजू शकते. आम्ही त्यास सामोरे जातो. दुसऱ्या दिवशी एका भारतीय फलंदाजाला त्याच कारणास्तव मैदानाबाहेर जावे लागले. मला वाटते की येत्या आठवड्यात प्रत्येकजण विचार करत होता की ते कधी येणार आहेत. कसोटीसाठी पांढरे कपडे परिधान करणं हे अनेकांसाठी गैरसोयीचं आहे. अशावेळी चहूबाजूंनी खूप चिंता असते.'

स्मृती मंधानाचं दमदार शतक, ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली भारतीय

त्या पाच दिवसांच्या कसोटीदरम्यान इंग्लंडचा जवळजवळ अर्धा संघ त्यांच्या पिरिएड्समध्ये होता. पुढे तीनं सांगितले की, 'नेट स्कीवर्सची पाळी चौथ्या दिवशी आली. इंग्लंडच्या अष्टपैलूजवळ पूर्वीचा अनुभवही होता. तिने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात या परिस्थितीचा सामना केला होता. अंडरशॉर्ट्स आता स्किवर्सला आवश्यक वाटतात. परंतु या प्रसंगी अतिरिक्त संरक्षणाचा विचार होता. स्कीव्हर म्हणाली डॉक्टरांनी आम्हाला रक्त प्रवाह कमी करण्यासाठी काही औषधे दिली.'

टेस्ट क्रिकेटच्या तयारीसाठी ब्यूमोंटला क्लॉटिंग आणि दाहक-विरोधी औषधे देण्यात आली होती. ज्यामुळे रक्तस्त्राव कमी होतो. ही औषधे देखील वेदना कमी करण्यास मदत करतात. ही अतिशय सामान्य औषधे आहेत. असा अनुभव ब्यूमोंटने सांगितला.

महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये असतात हे 7 फरक, तुम्हाला माहिती आहेत का?

पीरियड्सबद्दल बोलणे अजूनही खेळात बऱ्याचदा निषिद्ध मानले जाते, परंतु इंग्लंडमधील महिला क्रिकेटपटू खेळात महिलांच्या आरोग्य सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या ध्येयावर आहेत. तिने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत महिला आरोग्य गट स्थापन करण्यासाठी काम केले आहे. खेळाडूंच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की मासिक पाळी आणि कामगिरी, हाडांचे आरोग्य, स्तनांची काळजी, गर्भनिरोधक, गर्भधारणा आणि प्रजननक्षमता हे मुख्य मुद्दे आहेत ज्याबद्दल खेळाडूंना अधिक जाणून घ्यायचे होते.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Health, Indian women's team, Periods