S M L

भारत-पाकिस्तानाचे काही यादगार सामने

क्रिकेट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते भारत-पाकिस्तान मॅच .दोन देशांच्या क्रिकेटचा मानबिंदू म्हणून या सामन्यांकडे पाहिलं जातं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 04:53 PM IST

भारत-पाकिस्तानाचे  काही यादगार सामने

18 जून : क्रिकेट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते भारत-पाकिस्तान मॅच .दोन देशांच्या क्रिकेटचा मानबिंदू म्हणून या सामन्यांकडे पाहिलं जातं.

अशाच काही यादगार सामन्यांची नोंद घेऊया.

1. मेलबोर्न,1985मेलबोर्नमध्ये झालेल्या सामन्यात कपिल देवने 33 धावांवर 3 विकेट घेऊन पाकिस्तानची हालत टाईट केली होती. पुढे जावेद मियादादनं पाकिस्तानला सामन्यात परत आणण्याचे थोडे प्रयत्न केले पण सारे निष्फळ.अखेरीस पाकिस्तानचा स्कोअर 9बाद 176इतका झाला .या सामन्यात भारतानं शानदार  विजय मिळवला.

2. शारजाह,1986

हा सामना अत्यंत रोमांचक होता .या सामन्यात पाकिस्तानला  जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलवर 4 धावा हव्या होत्या . जावेद मियांदाद बॅटिंग करत होता तर चेतन शर्मा बॉलिंग करत  होता.शर्माच्या फुल टॉसवर मियांदाद साहेबांनी  अत्यंत अनपेक्षित चौकार मारला आणि सामना फिरवला.पाकिस्तान जिंकला आणि जावेद मियांदाद हिरो ठरला.

Loading...
Loading...

3. 2003 विश्वचषक

भारत-पाकिस्तानमध्ये झालेला हा ऐतिहासिक सामना रंगला तो शोएब आणि सचिनच्या चढाओढीमुळं. या सामन्यात सचिननं 75 चेंडूत 98 धावा केल्या .तर शोएबने सचिनला आणि फक्त सचिनलाच बाद केलं तेही 72 धावा देऊन .अर्थातच सचिनच्या धुवांदार खेळाच्या जोरावर भारत हा सामना जिंकला होता .

4. मोहाली ,2011

भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या या रोमहर्षक सामन्यात सचिननं 85 धावांची सुंदर खॆळी करून फॅन्सची मन जिंकली होती .होम ग्राउंडवर झालेल्या या विॆश्वचषकाच्या सेमी फायनलमधे भारताच्या स्ट्रॉंग फिल्डिंगसमोर  पाकिस्तानने नांगी टाकली .हा सामना भारत 29 धावांनी जिंकला होता.

5. ढाका 2014

आशिया कपचा हा सामना शेवटपर्यंत उत्सुकता वाढवत राहिला.पाकिस्ताला 10 चेंडूत 11 धावा हव्या होत्या. तेव्हा त्यांचे 6 गडी बाद झाले होते. पण पुढच्या 10 मिनटात त्यांच्या 3 विकेट्स पडल्या. आता 4बॉलमध्ये 9 धावा अशी परिस्थिती होती .पण  आफ्रिदीनं पुढे दोन षटकार लगावले आणि पाकिस्तानने विजय खेचून आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 04:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close