कोण आहेत संजीव गुप्ता ज्यांनी सचिन, द्रविड आणि गांगुलीला 400 ई-मेल पाठवून घेतलं फैलावर?

कोण आहेत संजीव गुप्ता ज्यांनी सचिन, द्रविड आणि गांगुलीला 400 ई-मेल पाठवून घेतलं फैलावर?

संजीव गुप्ता यांच्यामुळेच कपिल देव यांनी दिला क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयमध्ये परस्पर हितसंबंधांवरून वाद सुरू आहे. यात आता भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणारी कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमान गायकवाड यांच्यात समितीला नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी सचिन तेंडुलकर, द्रविड आणि लक्ष्मणही याच नियमाचे शिकार झाले होते. दरम्यान या दिग्गज खेळाडूंना नोटीस पाठवण्याची जबाबदारी असते ती बीसीसीआयचे प्रमुख अधिकारी संजीव गुप्ता. त्यामुळं कोण आहेत हे संजीव गुप्ता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इंदौरला राहणारे संजीव गुप्ता हे बीसीसीआयच्या कामावर देखरेख करण्याचे काम करतात. गेल्या तीन वर्षात त्यांनी बीसीसीआय आणि दिग्गज खेळाडूंना फैलावर घेतले आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेले 45 वर्षांचे संजीव यांनी जवळ जवळ तीन वर्षात दिग्गजांना 400 ई-मेल पाठवले आहेत.

वाचा-सलामीच्या 'टेस्ट'मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे

संजीव गुप्तांना म्हटले जाते हिटलर

संजीव गुप्ता यांनीच सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांना परस्पर हितसंबंधावरून ई-मेल पाठवले होते. एवढेच नाही तर बीसीसीआयचे प्रत्येक नियम त्यांना तोंडपाठ आहेत. खेळाडूंना किंवा अधिकाऱ्यांना नोटीस पाठवताना आपल्या ई-मेलमध्ये गुप्ता नियमांचा स्पष्ट उल्लेख करतात. त्यामुळं आतापर्यंत एकदाही त्यांच्या कामावर शंका घेण्यात आलेली नाही. त्याच्या उद्देश फक्त लोढा समितीच्या नियमांचे 100% पालन करावे एवढेच असते.

वाचा-कसोटीमध्येही रोहितचा टी-20 अवतार! झळकावलं शानदार शतक

कपिल देव यांनी दिला सल्लागार समितीचा राजीनामा

संजीव गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाला नवे प्रशिक्षक निवडूण देणाऱ्या समितीला नोटीस पाठवली होती. यात कपिल देव यांच्यावरही परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाअंती कपिल देव यांनी आपल्या या पदाचा राजीनामा सोपावला आहे. याचबरोबर शांता रंगास्वामी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याच समितीनं रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड केली होती.

वाचा-जबरा फॅनचं विराटला सरप्राईज! अंगावरचे 15 टॅटू पाहून अनुष्कालाही बसेल धक्का

VIDEO : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, उमेदवारीसाठी थेट रास्ता रोको

Published by: Priyanka Gawde
First published: October 3, 2019, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading