मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Cricket Laws: अखेर रन आऊटच्या 'त्या' निर्णयावर MCC कडून स्पष्टीकरण, बॅट्समनना दिला थेट इशारा

Cricket Laws: अखेर रन आऊटच्या 'त्या' निर्णयावर MCC कडून स्पष्टीकरण, बॅट्समनना दिला थेट इशारा

त्या निर्णयावर एमसीसीचं स्पष्टीकरण

त्या निर्णयावर एमसीसीचं स्पष्टीकरण

Cricket Laws: क्रिकेट नियम बनवणारी आणि त्या नियमांचं संरक्षण करणरी संस्था म्हणजे मेरिलिबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसी. एमसीसीनं नुकतंच क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यात नॉन स्ट्राईक एन्डवरील रन आऊटबाबतच्या नियमाचाही समावेश आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

लंडन, 25 सप्टेंबर: शनिवारी इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय महिला संघानं इंग्लंडला वन डे मालिकेत व्हाईटवॉश देण्याचा पराक्रम गाजवला. मालिकेतील तीनही वन डे जिंकून भारतानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्याचबरोबर अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या महान गोलंदाज झुलन गोस्वामीला विजयी निरोप दिला. झुलनच्या कारकीर्दीची सांगता करताना भारतीय महिलांनी अशा प्रकारे तिला विजयाचं खास गिफ्ट दिलं. पण भारताच्या या विजयाला वादाची किनारही लाभली.

दिप्ती शर्माचं 'मंकडिंग'

लॉर्ड्सवरच्या त्या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडसमोर 170 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर इंग्लंडची अवस्था 9 बाद 118 अशी झाली होती. भारतीय संघ हा सामना सहज जिंकणार असं वाटत होतं. पण अखेरची विकेट टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरली. डीन आणि केम्प या जोडीनं झुंजार भागीदारी करुन इंग्लंडला विजयाकडे नेलं. पण 17 धावा हव्या असताना डीन दिप्ती शर्मानं बॉल टाकायच्या आधीच क्रीझच्या बाहेर गेली. दिप्तीनं चलाखीनं त्याच वेळेला नॉन स्ट्राईक एन्डला डीनला रन आऊट केलं. त्यामुळे भारतानं हा सामना 16 धावांनी खिशात घातला. पण दिप्ती शर्माच्या त्या कृतीवर इंग्लंड संघानं मात्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा - MS Dhoni: रिटायरमेंट नाही तर धोनीनं केलं एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग, पण का? पाहा Video

MCC चं स्पष्टीकरण

क्रिकेट नियम बनवणारी आणि त्या नियमांचं संरक्षण करणरी संस्था म्हणजे मेरिलिबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसी. एमसीसीनं नुकतंच क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यात नॉन स्ट्राईक एन्डवरील रन आऊटबाबतच्या नियमाचाही समावेश आहे. काल घडलेल्या घटनेनंतर एमसीसीनं एक अधिकृत माहिती जारी केली आहे. त्यात बॅट्समनन्सना थेट इशाराच देण्यात आला आहे.

एमसीसीनं आपल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय... 'बॉलरच्या हातून बॉल सुटेपर्यंत नॉन स्ट्राईकर एन्डच्या बॅट्समननं क्रीझच्या आत असावं. तेव्हाच काल जे घडलं ते होणार नाही. कालचा निर्णय नियमाला धरुन होता.'

हरमनकडून दिप्तीची पाठराखण

शनिवारचा तो सामना संपल्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं दिप्ती शर्माची पाठराखण केली होती. दिप्तीच्या त्या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त करताना हे खेळभावनेला धरुन नसल्याचं म्हटलं होतं. पण हरमननं मात्र यावर खडे बोल सुनावले. 'आम्ही त्याआधी इंग्लंडच्या 9 विकेट्स काढल्या होत्या. मला वाटतं आता प्रत्येकजण यावर बोलेल. पण मी माझ्या प्लेयरला सपोर्ट करते. सगळ काही झालं ते नियमांना धरुन होतं.' असं हरमन म्हणाली.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports