• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • क्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द!

क्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द!

क्रिकेटचा नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) आणखी एक मोठा बदल केला आहे. क्रिकेटच्या मैदानात आता बॅट्समनऐवजी (Batsmen) बॅटर (Batter) या शब्दाचा वापर केला जाईल.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : क्रिकेटचा नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) आणखी एक मोठा बदल केला आहे. क्रिकेटच्या मैदानात आता बॅट्समनऐवजी (Batsmen) बॅटर (Batter) या शब्दाचा वापर केला जाईल. एमसीसीच्या समितीने या बदललेल्या नियमाला मंजुरी दिली आहे. एमसीसी हा बदल लगेच लागू करणार आहे. खेळामध्ये कोणत्याही प्रकारचा लिंगभेद होऊ नये म्हणून एमसीसीने हे पाऊल उचललं आहे. ...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार! महिला क्रिकेटने जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. महिला आणि मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लिंग समानता आणण्यासाठी हे पाऊल उचल्याचं एमसीसीने सांगितलं. याआधी अनेक संस्था आणि माध्यमांनी बॅटर हा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली. याआधी 2017 साली आयसीसी आणि महिला क्रिकेटच्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत केल्यानंतर बॅट्समन हा शब्दच कायम ठेवण्यात आला, पण आता या शब्दात बदल करून बॅटर हा शब्द वापरला जाणार आहे. क्रिकेटच्या खेळात बॅट्समन हा शब्द लिंगभेदी होता, पण बॉलर्स (Bowlers) आणि फिल्डर (Fielder) या शब्दात कोणताही लिंगभेद नसल्यामुळे हे दोन्ही शब्द तसेच वापरले जाणार आहे. मराठीमध्ये आधीपासूनच महिला आणि पुरुषांना फलंदाज आणि गोलंदाज म्हणलं जातं, जे कुठेही लिंगभेद करणारं नाही. वेस्ट इंडिजला 2 T20 World Cup जिंकवून देणारा खेळाडू भ्रष्टाचारात अडकला, ICC ची नोटीस
  Published by:Shreyas
  First published: