नवऱ्यानंतर बायकोचं करिअर धोक्यात, भारताच्या स्टार होस्टला टक्कर देणार ही मॉडेल

नवऱ्यानंतर बायकोचं करिअर धोक्यात, भारताच्या स्टार होस्टला टक्कर देणार ही मॉडेल

भारताची स्पोर्ट अँकर मयंती लँगरला आता तिचीच सहकारी किरा नारायणन हिची टक्कर असणार आहे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर टीम इंडियाच्या सामन्याआधी शो होस्ट करताना दिसते. हजराजबाबी, क्रिकेटची असलेली माहिती यामुळे तिचं वेगळेपण जाणवतं. मयंती लँगरने सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्येही होस्ट केलं आहे. आता एक नवा चेहरा तिला टक्कर देणार आहे. ती मॉडेल दुसरी तिसरी कोणी नसून तिचीच सहकारी किरा नारायणन आहे.

किरा नारायणन मयंती लँगरसोबत दिसली होती. किराने स्पोर्ट्स रिपोर्टिंग केलं आहे. तसंच ती हरभजन सिंगसोबतही दिसली आहे. याआधी किरा नारायणन प्रो कबड्डी लीग होस्ट करत होती पण आता ती क्रिकेट कव्हरेजही करते.

अँकरिंगसह ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अलादीन द म्यूझिकल मूव्ही या चित्रपटात प्रिन्सेस जॅस्मिनची भूमिका केली होती. चेन्नईत जन्मलेल्या किराचं बालपण मलेशियामध्ये गेलं. किराला टेनिसची तसंच अभिनयाचीही आवड आहे.

टेलिव्हिजनमध्ये किराने प्रो कबड्डी लीगमधून पाऊल टाकलं. तेव्हा तिने आरके आणि सुहेलसोबत लाइव्ह शो होस्ट केला होता. किराने तामिळ चित्रपटातही काम केलं आहे. याशिवाय तिनं शिक्षिका म्हणून काम केलं. तर काही ज्वेलरी ब्रँडसाठी मॉडेलिंगसुद्धा केलं आहे.

मयंती लँगरचा पती स्टुअर्ट बिन्नी भारताचा क्रिकेटपटू आहे. त्यानं टीम इंडियाकडून 6 कसोटी, 14 वनडे आणि 3 टी 20 सामने खेळले आहेत. भारताकडून शेवटचा सामना 2016 मध्ये खेळलेल्या बिन्नीला त्यानंतर संघात स्थान मिळवता आलं नाही. अष्टपैलू खेळाडू असलेल्या स्टुअर्ट बिन्नीचे रणजीमध्ये कर्नाटक संघातील स्थानही धोक्यात आलं. सध्या तो नागालँडकडून खेळत आहे.

वाचा : 17 चेंडूत वसूल केल्या 76 धावा, महिला क्रिकेटपटूची तुफान फटकेबाजी

First published: February 26, 2020, 5:21 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या