मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धक्कादायक! टीम इंडियाचा हा खेळाडू मानसिक दृष्ट्या अडचणीत, कोचचा दावा

धक्कादायक! टीम इंडियाचा हा खेळाडू मानसिक दृष्ट्या अडचणीत, कोचचा दावा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (India vs England) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या दोन्ही सीरिजसाठी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याची टीममध्ये निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (India vs England) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या दोन्ही सीरिजसाठी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याची टीममध्ये निवड झाली आहे, पण मागचं एक वर्ष मयंकसाठी फार चांगलं राहिलं नाही. टेस्ट टीमच्या अंतिम-11 खेळाडूंमध्येही मयंकला जागा मिळणं कठीण झालं आहे. करियरची चांगली सुरुवात केल्यानंतरही थोड्या अपयशानंतर मयकंला बाहेर बसवण्यात आलं, त्यामुळे मयंक मानसिकदृष्ट्या अडचणीत आल्याचा धक्कादायक दावा त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक आर. एक्स मुरली (RX Murali) यांनी केला आहे.

आर.एक्स मुरली इनसाईड स्पोर्ट्ससोबत बोलत होते. मयंक अजूनही पूर्णपणे मानसिक अडचणीतून बाहेर आलेला नाही, असं मुरली म्हणाले. मयंक अग्रवाल सध्या मुंबईत बीसीसीआयच्या (BCCI) बायो-बबलमध्ये आहे. 2 जूनला तो टीम इंडियासोबत इंग्लंडला रवाना होईल.

'ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मयंकला स्वत:वरच संशय यायला लागला. सगळं काही आपल्या विचारांवर अवलंबून असतं. जर काहीच योग्य होत नसेल, तर तुमच्या डोक्यात दोन प्रकारच्या गोष्टी येतात. तुमचं मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात होते. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर संशय घेता. मयंकसोबतही हेच झालं,' असं मुरली म्हणाले.

'प्रत्येक खेळाडूमध्ये घबराट असते, तुम्ही यशापेक्षा अपयश जास्त बघता. जेव्हा अपयशाचा विचार डोक्यात आला तरी तुम्ही घाबरता आणि टीममध्ये खूप स्पर्धा आहे, हे तुम्हाला दिसतं, तेव्हा तुम्ही प्रक्रियेतून बाहेर पडता. ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर मयंकने आपल्या मानसिक स्थितीवर काम केलं आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली,' असी प्रतिक्रिया मुरली यांनी दिली.

मयंक अग्रवालने आयपीएल 2021 मध्ये 7 मॅच खेळून 43.33 च्या सरासरीने 260 रन केले, त्याचा स्ट्राईक रेटही 140 पेक्षा जास्तचा होता. इंग्लंड दौऱ्याआधी मयंक लयीत आला आहे, त्यामुळे आता त्याला खेळण्याची संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Cricket, Team india