रोहितची जागा घेणार मयंक अग्रवाल, 'या' खेळाडूची करणार सुट्टी!

रोहितची जागा घेणार मयंक अग्रवाल, 'या' खेळाडूची करणार सुट्टी!

विंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मयंक अग्रवालला संधी मिळू शकते. कसोटी क्रिकेटमध्ये 8 सामन्यात त्यानं दोन द्विशतकं झळकावली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा फलंदाज मयंक अग्रवालच्या वेगवान फटकेबाजीमुळे त्याला आता एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते. सलामीला खेळणारा मयंक अग्रवाल पुढच्या महिन्यात विंडीजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड होऊ शकते. विंडीजविरुद्ध जर उप कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्याआधी रोहितला विश्रांती दिल्यास मयंक अग्रवालला संधी मिळेल.

न्यूझीलंड दौऱ्यात फलंदाजीची मदार भारताच्या आघाडीच्या फलंदाजांवर असेल. त्यात रोहित शर्माची महत्त्वाची भूमिका असेल. या दौऱ्यात भारत 5 टी20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने होणार आहे. विंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यात मयंक अग्रवाल पर्याय ठरू शकतो. त्याने आतापर्यंत लिस्ट ए मध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने आणि 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतकांचा समावेश आहे. शिखर धवन सध्या फॉर्ममध्ये नाही. त्यातच केएल राहुलशिवाय आणकी एक पर्याय म्हणून मयंक अग्रवालकडे पाहिलं जात आहे.

वर्ल्ड कपमध्ये अखेरच्या काही सामन्यांवेळी विजय शंकरला दुखापत झाल्यानंतर मयंक अग्रवालला संघात घेतलं होतं. त्याला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही मात्र त्याने कामगिरीत सुधारणा करत आणि आक्रमक खेळाच्या जोरावर आपली दावेदारी सिद्ध केली आहे. भारतात 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपला लक्षात घेता मयंक अग्रवाल पर्याय ठरू शकतो. धवनची कामगिरी चांगली असली तरी त्याला दुखापतींमुळे सातत्याने संघाबाहेर रहावं लागतं. अशा परिस्थितीत तो पुढच्या वर्ल्ड कपमध्ये किती तंदुरुस्त असेल आणि खेळू शकेल हा प्रश्नच आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी म्हटलं होतं की, निवड समिती जर सलामीवीर फलंदाजाला पर्याय शोधत असेल तर मंयकचे नाव चांगले आहे. कसोटी क्रिकेटमधला खेळाडू असला तरी तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही खेळू शकतो. त्याच्या प्रतिभेवर कोणतीही शंका उपस्थित करता येत नाही. सुरुवातीला तो विकेट गमवायचा पण आता तसं होत नाही. त्याने फक्त 8 कसोटीमध्ये दोन द्विशतकं नावावर केली आहे.

Published by: Suraj Yadav
First published: November 18, 2019, 8:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading